शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

चटपांचे ठरले; युती व आघाडीचे मात्र अडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 06:00 IST

राजुरा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सुदर्शन निमकर हे आघाडीत ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला यावी म्हणून मुंबई-दिल्लीच्या वाऱ्या करीत आहे. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढले होते. या निवडणुकीत निमकर राष्ट्रवादीकडून लढले. त्यांना काँग्रेसच्या तुलनेत निम्मीच मते मिळाली होती.

ठळक मुद्देरणधुमाळी : दोन्ही धोटे आमने-सामने येणार वा नवा सामना रंगणार?

राजेश भोजेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिवती व कोरपना या अतिदुर्गम तालुक्यांचा समावेश असलेल्या राजुरा मतदार संघाची ही निवडणूक मतदारांना नवी राजकीय मेजवाणी देणारी ठरणार आहे. या मतदार संघात नेहमी तिरंगी लढतीचा सामना बघायला मिळाला आहे. आता होऊ घातलेली निवडणूकही याला अपवाद नसणार असे चित्र आहे. राजकीय पक्ष निवडणुकीच्या आखाड्यात कोणाला उतरवते, यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.राजुरा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सुदर्शन निमकर हे आघाडीत ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला यावी म्हणून मुंबई-दिल्लीच्या वाऱ्या करीत आहे. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढले होते. या निवडणुकीत निमकर राष्ट्रवादीकडून लढले. त्यांना काँग्रेसच्या तुलनेत निम्मीच मते मिळाली होती.यामुळे त्यांचा दावा पक्षश्रेष्ठी कितपत मान्य करतात हे बघण्यासारखे आहे. या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला असली तरी मते मात्र तुल्यबळ होती. या आधारे ही जागा काँग्रेसकडेच राहतील हे जवळजवळ निश्चित मानले जात आहे. असे झाल्यास माजी आमदार सुभाष धोटे हे पुन्हा मैदानात असतील. परंतु उमेदवारीची अधिकृत घोषणा होईपर्यंत निमकर प्रयत्नाची पराकाष्ठा करतील, असेही सूत्राचे म्हणणे आहे.युतीमध्येही फारसे आलबेल दिसत नाही. युतीमध्ये राजुरा मतदार संघ शिवसेनेकडेच असायचा. परंतु एकदाही शिवसेनेने ही जागा जिंकली नाही.२०१४ च्या निवडणुकीत युतीचा काडीमोड झाल्याने भाजप व शिवसेना स्वतंत्र लढले. यामध्ये भाजपने पहिल्याच निवडणुकीत ही जागा जिंकली.यावेळी या जागेसाठी शिवसेनेकडून कोणीही पुढे न आल्याने या निवडणुकीत युतीमध्ये भाजपचा उमेदवार असेल हे स्पष्ट आहे. यावेळी भाजप विद्यमान आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांच्यावर बाजी लावते वा नवा उमेदवार पुढे आणते. याबाबत प्रतीक्षा कायम आहे. पक्षातील जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे व खुशाल बोंडे यांनी अप्रत्यक्ष दंड थोपटल्याने हा संभ्रम वाढला आहे. गेली निवडणूक अ‍ॅड. संजय धोटे यांनी जिंकली, परंतु मताधिक्य कमी होते. या निवडणुकीत पक्षाने धोका पत्करू नये, ही सबब पुढे करून हे दोनही इच्छुक पुढे आल्याचे बोलले जात आहे.या अंतर्गत दावेदारीने राजुºयात भाजपचा चेहरा जुना की नवा हा पेच मतदारांमध्ये पडला आहे. युती आणि आघाडीला शह देण्यासाठी गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप हे यावेळी पुन्हा विधानसभेच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. काही महिन्यांपासून त्यांनीही जनसंपर्क वाढविला आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे या मतदार संघात तिरंगी सामन्याचे संकेत दिसत आहे.त्यामुळे तीन दिग्गजांची ही तिरंगी लढत मतदारांसाठी नवी मेजवाणी ठरणार असल्याने अन्य दोन उमेदवारांकडे जनता उत्सुकतेने बघत आहे.मतदार संघातील आमदार१९६२ व १९७२ - विठ्ठलराव धोटे (काँग्रेस)१९६७ - श्रीहरी जीवतोडे - (अपक्ष )१९७८ - बाबूराव मुसळे (जनता पार्टी)१९८० व १९८५ - प्रभाकर मामुलकर (काँग्रेस)१९९०,१९९५ व २००४-अ‍ॅड. वामनराव चटप(जनता दल)१९९९ - सुदर्शन निमकर -(काँग्रेस)२००९ -सुभाष धोटे (काँग्रेस)२०१४ -अ‍ॅड. संजय धोटे (भाजप)

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019