शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दररोज 10 ते 15 जणांच्या नशिबी शिवभोजन थाळीही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 05:00 IST

जिल्ह्यात २६ शिवभोजन केंद्र आहेत. या केंद्रातून दररोज साधारणत: तीन हजार ७०० लोकांना जेवन दिले जाते. कोरोनाकाळात चंद्रपुरात अनेक रुग्ण भरती होत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईसुद्धा राहतात. त्यातील गोरगरिब या थाळीचा लाभ घ्यायचे. त्यामुळे केंद्रावर गर्दी दिसून येते. परंतु, या केंद्राची वेळ सकाळी १२ वाजेपर्यंतच असते. त्यातही थाळीची संख्या ही मोजकीच आहे.  त्यामुळे अनेकांना खाली हात परत जावे लागते.

ठळक मुद्देतीन हजार ७०० जण घेतात लाभ : २६ केंद्रावरुन सेवा सुरु

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : कुणीही उपाशी राहू नये, यासाठी राज्य सरकारने शिवभोजन थाळी सुरु केली. या योजनेतंर्गत जिल्ह्यात २६ शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रसंचालकांना शासनाकडून प्रति थाळी अनुदान ठरवून देण्यात आले. विशिष्ट वेळेपर्यंतच हे केंद्र सुरू राहत असल्याने प्रत्येक केंद्रावरुन दररोज १५ ते २० जणांना रिकाम्या हाताने परत जावे लागत असल्याचे वास्तव आहे. कोरोनाकाळात कोणीही उपाशी राहू नये, यासाठी दहा रुपयांत शिवभोजन थाळी देण्यास राज्य सरकारने सुरुवात केली. या योजनेचा जिल्ह्यातील कामगार, मजूर, निराधारांना फायदा होत आहे. जिल्ह्यात २६ शिवभोजन केंद्र आहेत. या केंद्रातून दररोज साधारणत: तीन हजार ७०० लोकांना जेवन दिले जाते. कोरोनाकाळात चंद्रपुरात अनेक रुग्ण भरती होत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईसुद्धा राहतात. त्यातील गोरगरिब या थाळीचा लाभ घ्यायचे. त्यामुळे केंद्रावर गर्दी दिसून येते. परंतु, या केंद्राची वेळ सकाळी १२ वाजेपर्यंतच असते. त्यातही थाळीची संख्या ही मोजकीच आहे.  त्यामुळे अनेकांना खाली हात परत जावे लागते. त्यामुळे थाळीची संख्या तसेच वेळ वाढवून देण्याची मागणी होत आहे.

रोज तीन हजार ७०० जणांचे पोट भरते, बाकीच्याचे काय?

जिल्ह्यात २६ शिवभोजन केंद्र आहेत. त्या केंद्राचा लाभ साधारणत: तीन हजार ७०० जण घेत असतात. परंतु, अनेकजणांना थाळी भेटत नसल्याने गेल्यापावली परत यावे लागते. एका केंद्रावरुन किमान १० ते १५ जण परत जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे जिल्ह्यात केंद्राची संख्या तसेच थाळी संख्या वाढवावी, त्यासोबतच जेवन वितरीत करण्याची वेळ वाढविण्याची गरज आहे. 

जिल्हा सामान्य रुग्णालय केंद्र जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी जिल्ह्याबाहेरील नागरिक येत असतात. यातील बहुतेकजण शिवभोजन थाळी घेत असतात. त्यामुळे येथील केंद्रावरील थाळी लवकरच संपत असते. या केंद्रावर साधारणत: १५ ते २० जण परत जात असतात. 

बसस्थानक केंद्र शहरात कामानिमित्त अनेकजण येत असतात. बसस्थानकाशेजारी केंद्र असल्याने अनेकजण या केंद्रावर जात असतात. त्यामुळे या केंद्रावर नेहमीच रांग दिसून येते. परिणामी येथील थाळी लवकरच संपत असते. त्यामुळे साधारणत: दहा ते बाराजण परत गेले.

 

टॅग्स :shiv bhojnalayaशिवभोजनालय