शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

सावली तालुक्यात मजुरांची नोंदणीच नाही

By admin | Updated: March 24, 2015 00:44 IST

महाराष्ट्र शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे मजुरांना रितसर नोंदणीकृत करून मंडळाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ देणारा...

गेवरा : महाराष्ट्र शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे मजुरांना रितसर नोंदणीकृत करून मंडळाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ देणारा कायदा अस्तित्वात असला तरी सावली तालुक्यात मात्र कामगार कायद्याचा प्रभावी वापर कोणत्याही स्तरावर होत नसल्याने चित्र आहे.प्रशासकीय स्तरावरून अकुशल कुशल पद्धतीने होत असलेल्या बांधकामातील मजुरांमध्ये या कायद्याची जागृती नाही. यासाठी कोणत्याही सामाजिक संघटना तसेच संबंधित प्रशासनाकडून प्रभाविपणे प्रयत्न होताना दिसत नाही. त्यामुळे हा कायदा अस्तित्वात राहुनही येथील मजुर नोंदणीकृत झालेले नाहीत. सावली तालुक्यात जिल्हा प्रसासनाकडून अनेक इमारती व इतर बांधकाम मंजूर करून ग्रामपंचायतस्तरावर कंत्राटदाराकडून केले जातात. यावर मजुरांची आवश्यकता असते. या कायद्याप्रमाणे कामांवर असणाऱ्या मजुरांची नोंद स्थानिक पातळीवरून विहीत नमुना पाच नियम ३३(१) मध्ये लाभार्थी म्हणून नोंदणीसाठी अर्ज करून जिल्हा कामगार मंडळ अधिकारी कार्यालयाकडे सादर करावयाचा असतो. मात्र त्यासाठी ३० सप्टेंबर २०१४ च्या पुर्वीचा नोंदणीकृत कंत्राटदाराच्या कामावरील ९० दिवसांच्या प्रमाणपत्राची अट शिथील करून आयुक्त तथा अध्यक्ष महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ मुंबई यांचे परिपत्रकान्वये ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका आदी स्थानिक स्वराज संस्थांनी दिलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे बांधकाम कामगारांची नोंदणी करून घेणे बंधनकारक आहे. या परिपत्रकानुसार मनरेगासह इतर बांधकासाठी लागणाऱ्या कामगारांची नोंदणी करता येणे शक्य असल्याने मनरेगा प्राधिकरण व संबंधित कामगार विभाग यांच्या समन्वयातून या कायद्याचा प्रभावी उपयोग केल्यास सावली तालुक्यातील सर्व ग्रामीण व शहरी मजुरांना फायदा होवून शासनाचा उद्देश सफल होवू शकतो. मात्र कामगरांची नोंदणीच न झाल्याने या तालुक्यातील कामगारांना या योजनेचा आजवर लाभ झालेला नाही. सद्यस्थितीत बांधकामासाठी स्पर्धा सुरू असून याचा लाभान्वित घटक विशिष्ट वर्ग आहे. त्यातून प्रत्यक्ष लाभधारक वंचित होताना दिसतो. किमान तालुका प्रशासनाकडून या कायद्याबाबतच्या अस्तित्वाची जाणिव प्रत्येक ग्रामपंचायती, संबंधीत बांधकाम कंत्राटदारांना करून दिल्यास तालुक्यातील नोंदीत बांधकाम मजुरांची संख्या वाढून श्रमाला प्रतिष्ठा देणाऱ्या कायद्याचा फायदा सर्व सामान्य मजुरांना होणार आहे. (वार्ताहर)