रंगभूमी कलाकार चहा विकून, मजुरी करून करताहेत गुजराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 05:00 AM2020-11-11T05:00:00+5:302020-11-11T05:00:25+5:30

कोरोना काळाने तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बॅकस्टेज हरहुन्नरी कलावंतांच्या ठणकत्या वेदना पुन्हा गहिरे झाल्या. कुणी चहाची टपरी चालवितो. कुणी मटनमासे विकतो तर कुणी मजुरी करून कुटुंबाचा गाडा ओढतो.

Theater artists make a living by selling tea and earning a living | रंगभूमी कलाकार चहा विकून, मजुरी करून करताहेत गुजराण

रंगभूमी कलाकार चहा विकून, मजुरी करून करताहेत गुजराण

Next
ठळक मुद्देकोरोनाचा फटका : बॅकस्टेज कलावंतांच्या वाट्याला उपेक्षाच

राजेश मडावी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :
मराठी रंगभूमीच्या पडद्यावर कलेचे दमदार सादरीकरण करून सिनेसृष्टीत नावलौकीक मिळविणा-या कलावंतांची संख्या मोठी आहे. मात्र, या रंगभूमीवरील बॅकस्टेज कलावंत आयुष्यभर उपेक्षेचेच धनी होतात. यातून झाडीपट्टीची रंगभूमीही अपवाद नाही.
कोरोना काळाने तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बॅकस्टेज हरहुन्नरी कलावंतांच्या ठणकत्या वेदना पुन्हा गहिरे झाल्या. कुणी चहाची टपरी चालवितो. कुणी मटनमासे विकतो तर कुणी मजुरी करून कुटुंबाचा गाडा ओढतो. त्यांची ही भडभडती वेदना पडद्यावर दिसत नाही. पण उद्याच्या आशेवर विश्वास ठेवून चेह-याला पुन्हा मेकअपसाठी सज्ज होतो. यंदा तर हेही दिवस येणार की नाही, असा बॅकस्टेज कलावंतांचा सवाल आहे. सुनील अष्टेकर हे १२ वषार्ंपासून रंगभूमीवर कार्यरत आहेत. ते आता चहा टपरी चालवतात. दरवषीर् १०० नाटकात काम करतात. कोरोनामुळे कलावंतांचे हाल पाहवत नसल्याने झाडीपट्टी नाट्य मंडळाकडून पालकमंत्र्यांकडे निवेदन दिले. दारिद्रयाच्या गतेतून बाहेर काढण्यासाठी योजना सुरू करण्याची मागणी केली. कलावंत पितांबर श्रीरामे यांनीही हीच व्यथा मांडली आहे.

बॅकस्टेज कलावंतांवर कोरोनाने मोरघाड आली
रंगभूमीवरचा पडदा न उघडल्याने बॅकस्टेज कलावंतांचे हाल सुरू आहेत. शासनाने आता परवानगी दिली. कलावंतांचे मूळ प्रश्न जैसे-थे आहेत. कोरोनाने तर कलावंतांवर मोरघाडच (संकट) आली आहे. कुटुंब चालविणे कठीण झाले.
- सुनील अष्टेकर, कलाकार

कलावंतांना निवृत्ती वेतन लागू करावे
रंगभूमीची सेवा करणारे कलावंत सातत्याने उपेक्षेचे धनी राहिले आहेत. वृद्धापकाळात त्यांचे हाल होतात. त्यामुळे रंगभूमीचे कलावंत व संबंधित व्यक्तींना शासनाने निवृत्ती वेतन दिले पाहिजे.
- शबाना खान, ज्येष्ठ नाट्य कलावंत

पतीला काम नसल्याने मजुरीला जाते
झाडीपटी रंगभूमीचा आम्हाला मोठा आधार होता. कोरोनामुळे यापूवीच्या नाटकांचा हंगाम वाया गेला. यंदा हंगाम सुरू व्हायला वेळ आहे. कामे नसल्याने पतीसोबत मीदेखील इतरांच्या शेतीवर मजुरीसाठी जाते. तेव्हाच घरची चूल पेटते.
-निर्मला श्रीरामे, कुटुंबीय

Web Title: Theater artists make a living by selling tea and earning a living

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.