शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद शाळा कायमची बंद होण्यापासून वाचली...

By साईनाथ कुचनकार | Updated: May 4, 2023 16:09 IST

पटसंख्या वाढली, पाचवीला ३५ विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश

साईनाथ कुचनकार, चंद्रपूर : मागील शैक्षणिक सत्रात पटसंख्या कमी असल्याच्या कारणावरून येथून जवळच असलेले विसापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल बंद करण्याचा फतवा जिल्हा परिषद प्रशासनाने काढला होता. त्यावेळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून शाळा बंद न करण्यासाठी आंदोलन केले होते. चालू शैक्षणिक सत्रात विद्यार्थी पटसंख्या वाढविण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत जोरदार प्रयत्न केले. दरम्यान, पाचवीच्या वर्गात तब्बल ३५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. पटसंख्या वाढल्यामुळे येथील शाळा बंद होण्यापासून वाचली.

बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये मागील शैक्षणिक सत्रात वर्ग पाचवी ते दहावीत केवळ २२ विद्यार्थी शैक्षणिक धडे गिरवत होते. त्यामुळे अर्धे शैक्षणिक सत्र झाल्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने शाळा बंद करण्याचा फतवा काढला. त्याला ग्रामस्थांनी विरोध केला तसेच जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. जिल्हा परिषद हायस्कूलमधील पटसंख्या वाढविण्याची संधी मागितली. तेव्हापासून ग्रामपंचायतीमार्फत ज्यांचे पाल्य चौथ्या वर्गात होते, त्या पालकांची पालक सभा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वस्ती विभाग व टेकडी विभागात घेतली. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पालकांचे समुपदेशन केले. जिल्हा परिषद हायस्कूल नियमित सुरू राहिले पाहिजे, या संदर्भात मार्गदर्शन केले. त्याला गावातूनही चांगला प्रतिसाद मिळाला.

जिल्हा परिषद हायस्कूल, विसापूरमधील पटसंख्या वाढविण्यासाठी सरपंच वर्षा कुळमेथे, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य शारदा डाहुले, रिना कांबळे, सुरज टोमटे, हर्षला टोंगे, वैशाली पुणेकर, गजानन पाटणकर, सुनील रोंगे, प्रदीप गेडाम, दिलदार जयकर, सुरेखा इटणकर, विद्या देवाळकर आदींचे प्रयत्न कारणीभूत ठरले आहेत.

या विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश

सैनिक स्कूलमधील मयंक रवींद्र कांबळे याने वर्ग सहावी, बल्लारपूर जनता विद्यालयातील आर्यन मच्छिंद्र कुळमेथे याने वर्ग आठवी, बल्लारपूर दिलासाग्राम कॉन्व्हेंटमधील वेदांत दिनकर डाहुले याने वर्ग आठवी, पटेल हायस्कूल, चंद्रपूरमधील सम्यक सुनील पुणेकर याने वर्ग सहावीमध्ये प्रवेश घेऊन शिक्षकांचा आत्मविश्वास वाढविला. आता विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद हायस्कूलचे शिक्षण आवडत असल्याने पालकदेखील आपल्या पाल्यांचा प्रवेश घेत आहेत.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरSchoolशाळा