शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया - चंद्रपूर रेल्वेमार्गाच्या डबललाइनचे काम रखडलेलेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 13:36 IST

Chandrapur : आणखी किती दिवस करावी लागणार प्रवाशांना प्रतीक्षा

घनश्याम नवघडे लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : दोन वर्षांपूर्वी गोंदिया- नागभीड चंद्रपूर या रेल्वेमार्गाच्या डबललाइनच्या कामाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले. मात्र लाइनच्या विस्ताराची कोणतीही चिन्हे नाहीत. त्यामुळे प्रवाशांना या डबललाइनच्या कामाची अजूनही प्रतीक्षाच करावी लागणार आहे. 

७ जानेवारी २०२३ रोजी रेल्वेचे वरिष्ठ मंडल प्रबंधक मनिंदर उपल यांनी नागभीड जंक्शनला भेट दिली होती. तेव्हा पदाधिकारी आणि पत्रकार यांच्याशी अनौपचारिक चर्चा करताना डबललाइनच्या सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती दिली होती. 

गोंदिया-बल्लारशाह हा जवळजवळ २५० किलोमीटर अंतराचा रेल्वे मार्ग आहे. सध्या या मार्गावर अनेक प्रवासी गाड्यांचे अवागमन सुरू आहे. अनेक एक्सप्रेस गाड्याही या मार्गावर सुरू आहेत. गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांतील रेल्वेची अनेक स्थानके या मार्गावर असून रोज हजारो प्रवासी या मार्गाने प्रवास करतात. या मार्गाने केवळ प्रवासी गाड्याच नाही तर भोपाळ, इंदोर, भिलाई, शालीमार, सिकंदराबाद येथून मोठ्या प्रमाणावर मालगाड्या जात व येत आहेत. गोंदिया बल्लारशाह या रेल्वे मार्गावर दिवसभरातून २५ ते ३० मालगाड्या धावत असल्याने या मार्गावरील प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या चांगल्याच प्रभावित 9000 झाल्या आहेत. या मालगाड्यांमुळे प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या दोन ते तीन तास उशिरा धावत आहेत. एखादी मालगाडी एक दीड तासांनी सुटणार असेल तर एक्सप्रेस गाडी व पॅसेंजर गाडीला आहे त्याच ठिकाणी थांबविले जाते आणि प्रवाशांना ताटकळत राहावे लागते. 

तर अनेक समस्या सुटतील असे प्रकार टाळण्यासाठी रेल्वेने या मार्गावर डबल लाइन टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सध्या तरी या मार्गावरील डबल लाइनच्या सर्वेक्षणानंतर डबल लाइनच्या विस्ताराची कोणतीही हालचाल दिसत नाही. या मार्गावर रेल्वेची डबललाइन झाली तर अनेक समस्या निकाली निघणार आहेत. खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी या समस्येला वाचा फोडावी अशी मागणी केली जात आहे.

"खासदार म्हणून निवडून आल्यानंतर या भागाचा दौरा करीत असताना अनेक कार्यकर्त्यांनी या समस्येचा पाढा वाचला आहे. लवकरच मी गोंदिया-बल्लारशा या डबल लाइनच्या कामाची माहिती घेणार आहे आणि पुढील पाठपुरावा करणार आहे."- डॉ. नामदेव किरसान, खासदार, गडचिरोली चिमूर 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरrailwayरेल्वे