शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

गुंड प्रवृत्तीच्या 22 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने तिघांनी केला गेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2022 05:00 IST

धरमवीर यादव हा गुंड प्रवृत्तीचा होता. त्याच्याच दोन भावांच्या खुनाचा आरोप होता. अन्य गुन्हेही त्याच्यावर नोंद आहेत. त्याच्या या गुंड प्रवृत्तीमुळे अष्टभुजा परिसरातील नागरिक कमालीचे दहशतीत होते. तो बाहेर असला तर नागरिक घराबाहेर पडण्यास धजावत नव्हते. त्याच्या हत्येने नागरिक मनातून आनंदी झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एका गुंड प्रवृत्तीच्या २२ वर्षीय तरुणाला त्याच्याच तीन मित्रांनी धारदार शस्त्राने वार करून ठार केले. मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अष्टभुजा वाॅर्डातील रमाई नगरात घडलेली ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. धरमवीर यादव उर्फ डब्ल्यू (रा. अष्टभुजा वाॅर्ड) असे मृताचे नाव आहे. ही घटना उजेडात येताच स्थानिक गुन्हे शाखेने सूत्रं हलवून मुख्य आरोपी चेतन ऊर्फ सचिन सोनवणे याला ताब्यात घेतले. यानंतर संदीप तोरडे, स्वप्निल कातकर या आरोपींना अटक केली. मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास काही तरुणांनी धरमवीर यादव याला बोलावले. यानंतर त्यांच्यात चांगलाच वाद झाला. अशातच धरमवीरवर चाकूहल्ला करण्यात आला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. आपला जीव वाचविण्यासाठी त्याने जखमी अवस्थेतच घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, त्याच्या मित्रांनी त्याचा पाठलाग सोडला नाही. अष्टभुजा वाॅर्डातील रमा नगरात मंदिराजवळ त्याला गाठून तिघांनी धारदार शस्त्राने धरमवीरची निर्घृण हत्या केली. धरमवीर रक्ताच्या थारोळ्यात रात्रभर तिथेच पडून होता. सकाळी ही घटना उजेडात आली. रामनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. दरम्यान,  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना एक आरोपी माेरवा परिसरातील जंगलात लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाली. त्याआधारे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात सापळा रचून मोठ्या शिताफीने मुख्य आरोपी चेतन ऊर्फ सचिन सोनवणे याला ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखेचे संजय आतकुलवार, दीपक डोंगरे, प्राजस झिलपे, गणेश भोयर, चंदशेखर आसुटकर हे कारवाईत सहभागी झाले होते. दरम्यान, आरोपीला पुढील तपासासाठी रामनगर पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती पोलीस निरीक्षक खाडे यांनी दिली.

मृतकावर त्याच्याच दोन भावांच्या खुनाचा आरोपधरमवीर यादव हा गुंड प्रवृत्तीचा होता. त्याच्याच दोन भावांच्या खुनाचा आरोप होता. अन्य गुन्हेही त्याच्यावर नोंद आहेत. त्याच्या या गुंड प्रवृत्तीमुळे अष्टभुजा परिसरातील नागरिक कमालीचे दहशतीत होते. तो बाहेर असला तर नागरिक घराबाहेर पडण्यास धजावत नव्हते. त्याच्या हत्येने नागरिक मनातून आनंदी झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी