शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

पत्नीच्या डोळ्यांदेखत वाघाने केली पतीची शिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 10:46 IST

चिमूर तालुक्यातील सावरगावलगतच्या पांधरा बोडी शिवारातील थरार

चिमूर (चंद्रपूर) : झुडपात दडून बसलेल्या वाघाने अचानक झडप घालून पत्नीच्या डोळ्यादेखत फरफटत नेत तिच्या पतीची शिकार केली. चिमूर तालुक्यातील सावरगावपासून सुमारे एक किमी अंतरावरील शेतात काम करणाऱ्या शेतकरी दाम्पत्यावर झुडपात दडून असलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. ही थरारक घटना मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास तळोधी (बा.) वनपरिक्षेत्रातील बोडधा बिटात घडली. ईश्वर गोविंदा कुंभारे (४५) मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने शेतकऱ्यांची वाघाने झोप उडविली आहे.

सोमवारी रात्रीपासून पाऊस सुरू आहे. शेतीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतात धान पऱ्हे, पऱ्हाटी, सोयाबीन आदींची लागवड केली आहे. यामुळे दररोज शेतकरी शेताकडे जात आहे. सावरगावपासून एक किमी अंतरावर तळोधी वनपरिक्षेत्रांतर्गत असलेल्या बोडधा बिटातील नेरी वनक्षेत्रातील पांधरा बोडी शेतशिवारात ईश्वर कुंभारे हे पत्नीसह शेतात कामासाठी गेले होते. ईश्वर हे शेतात काम करत असताना झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर अचानक हल्ला चढवून झुडपात ओढत नेऊन ठार केले.

डोळ्यादेखत घडलेला हा प्रकार पाहून ईश्वरच्या पत्नीने आरडाओरड केली. परिसरातील शेतकरी धावून आले. गावालगत शेत असल्यामुळे गावकरीही आले. मात्र, काहीही उपयोग झाला नाही. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाने घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी तळोधी वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर, चंद्रकात रासेकर व वनरक्षक उपस्थित होते.

टॅग्स :Tigerवाघchandrapur-acचंद्रपूर