शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

काळी बाहुली, लिंबू-मिरची करणार त्याला पोलीस उचलणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 12:22 IST

अंधश्रद्धेविरुद्ध पाऊल : भानामती जादूटोणा करणाऱ्यांना बसणार चाप

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : विज्ञाननिष्ठ पुरोगामी विचारांची चळवळ सक्रिय आहे. मात्र, अजूनही अंधश्रद्धेचा जाच संपला नाही. वर्षभरात किमान पाच-सहा घटना घडतात. त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्याची गरज असतानाच प्रत्येक पोलिस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्याचे आदेश पोलिस महासंचालक कार्यालयाने दिले. पोलिस प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी झाल्यास भानामती जादूटोणा करणाऱ्यांना यापुढे तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.

राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, 'महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३च्या कलम ५ (१) अन्वये, महाराष्ट्र शासनास अनुमती प्रदान करण्यात आली. या शक्तीचा वापर करून, या अधिनियमातील कलम ५ (२) मध्ये आंतरभूत केलेली कर्तव्ये पार पाडण्यास पोलिस आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात सहायक आयुक्त (गुन्हे) तसेच पोलिस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्रात निरीक्षकांची दक्षता अधिकारी म्हणून नियुक्ती होणार आहे.

दक्षता अधिकाऱ्याची नियुक्ती होणार जादूटोणा कायद्यांतर्गत प्रकरण हाताळण्यासाठी एक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. तसेच तक्रारीची अंमलबजावणी व गुन्ह्याचा तपास याबाबत तक्रारदाराला दक्षता अधिकाऱ्याकडे दाद मागता येणार आहे. आदेश मिळाल्यानंतर संबंधित कार्यवाहीला सुरुवात करण्याबाबत आदेशात नमूद आहे.

प्रत्येक पोलिस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत अधिनियम २०१३ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात एक कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. या कक्षात पीडितांना आपल्या तक्रारी दाखल करता येईल.

पोलिस प्रशासनाचे आश्वासक पाऊल

  • अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये स्थापन करणे हे महाराष्ट्र पोलिसांचे एक आश्वासक पाऊल आहे. 
  • यामुळे जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होईल. 
  • या कक्षातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना जादूटोणाविरोधी कायद्याचे प्रशिक्षण देण्याबाबत पोलिस प्रशासनाकडून तयारी केली जात आहे.

"अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून सतत प्रबोधन सुरूच आहे. समितीच्या गेल्या अनेक दिवसांपासूनची एक मागणी या निमित्ताने पूर्ण झाली. मात्र, केवळ कक्ष स्थापन करून उपयोग काही नाही. पोलिसांचे व्यवस्थित ट्रेनिंग व्हावे. कायद्यातील तरतुदींची कडक अंमलबजावणी झाली तरच पीडित लोक आपल्या तक्रारी निर्भयपणे या कक्षाकडे दाखल करतील."- अनिल दहागावकर, जिल्हा संघटक अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती

 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर