शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सहाही विधानसभा क्षेत्राच्या लढतीचे चित्र स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 14:30 IST

काँग्रेस विरुद्ध भाजप असा रंगणार सामना : काँग्रेसची अंतिम यादी जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : महाविकास आघाडीतील काँग्रेसचे जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांतील उमेदवार रविवारी रात्री घोषित झाले. त्यामुळे आता जिल्ह्यातील सहाही विधानसभा क्षेत्रातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट सामना यावेळी विधानसभा क्षेत्रात बघायला मिळणार आहे. रविवारी रात्री घोषित झालेल्या काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये वरोरा विधानसभा क्षेत्रासाठी प्रवीण काकडे, चंद्रपूरसाठी प्रवीण पडवेकर, तर बल्लारपूर विधानसभा क्षेत्रासाठी संतोष रावत यांचे नाव निश्चित झाले आहे.

निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यापासून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कोण उमेदवार राहील याबाबत चर्चांना उधाण आले होते. महायुतीतील भाजपचे सहाही विधानसभा क्षेत्रातील उमेदवार घोषित झाल्यानंतरही महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने तीन विधानसभा क्षेत्रातील उमेदवार घोषित केले नव्हते. यामुळे सामान्य नागरिकांसह राजकीय नेत्यांचेही याकडे लक्ष लागले होते. सर्वाधिक चर्चेत असलेल्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून संतोष रावत यांचे नाव जाहीर झाले आहे. 

वरोरा विधानसभा क्षेत्रातून खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून तब्बल २६ इच्छुकांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली होती. त्यामुळे यातील कोणाला उमेदवारी मिळेल याबाबत सर्वत्र चर्चा होती. प्रवीण पडवेकर यांच्या नावाची घोषणा झाल्याने आता पडवेकर विरुद्ध जोरगेवार अशी लढत होणार आहे. 

विधानसभानिहाय लढती 

बानपूर किशोर जोरगेवार (भाजप) विरुद्ध प्रवीण पडवेकर (काँग्रेस) बल्लारपूर सुधीर मुनगंटीवार (भाजप)  विरुद्ध संतोष रावत (काँग्रेस) ब्रह्मापुरी विजय वडेट्टीवार (काँग्रेस) विरुद्ध कृष्णा सहारे (भाजप)चिमूर कीर्तिकुमार भांगडिया (भाजप) विरुद्ध सतीश वारजुकर (काँग्रेस)राजुरा सुभाष धोटे (काँग्रेस) विरुद्ध देवराव भोंगळे (भाजप)वरोरा प्रवीण काकडे (काँग्रेस) विरुद्ध करण देवतळे (भाजप)

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४chandrapur-acचंद्रपूर