शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

213 शिक्षकांची धडधड वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2022 05:00 IST

शिक्षक नोकरीसाठी टीईटी प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, टीईटीचे बोगस प्रमाणपत्र मिळवून राज्यात काहींनी नोकरी मिळविली असल्याचे उघड झाले असून या प्रकरणाचा आता पोलीस शोध घेत आहे. २०१३ पासून लागलेल्या कोणत्या शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्र मिळवून नोकरी मिळविली हे आता तपासले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शिक्षक पात्रता परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. दरम्यान, गैरप्रकारातील धागेदोरे शोधणे पोलिसांनी सुरू केले आहे. दुसरीकडे २०१३ पासून नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या टीईटी प्रमाणपत्राची तपासणी केली जाणार आहे. जिल्ह्यात २०१३ पासून प्राथमिक विभागात २१३ शिक्षकांची नियुक्ती झाली आहे. आता या सर्वांकडील टीईटी प्रमाणपत्र तपासणी केली जाणार आहे. यासाठी सोमवार दि. ७ ला सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हा परिषदेत प्रमाणपत्र मागविण्यात आले आहे. यामुळे शिक्षकांची धडधड आणखीच वाढली आहे.शिक्षक नोकरीसाठी टीईटी प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, टीईटीचे बोगस प्रमाणपत्र मिळवून राज्यात काहींनी नोकरी मिळविली असल्याचे उघड झाले असून या प्रकरणाचा आता पोलीस शोध घेत आहे. २०१३ पासून लागलेल्या कोणत्या शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्र मिळवून नोकरी मिळविली हे आता तपासले जात आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आणि शिक्षक संचालकांनी राज्यातील २०१३ पासून नियुक्त झालेल्या शिक्षकांचे प्रमाणपत्र शिक्षणाधिकाऱ्यांकडून मागितले आहे.  त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी या सर्वांना प्रमाणपत्र घेऊन हजर राहण्याचे गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कळविले आहे. जिल्ह्यात २०२३ पासून २१३ शिक्षकांना प्राथमिक विभागात नोकरी लागली आहे. त्यामुळे या सर्वांना प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. विशेष म्हणजे, माध्यमिकच्याही शिक्षकांच्या प्रमाणपत्राची पडताळणी होणार         आहे.

पुणे येथे होणार पडताळणी- २०१३ पासून आतापर्यंत उत्तीर्ण झालेल्या सर्वच शिक्षकांची प्रमाणपत्र पडताळणी पुणे येथे करण्यात येणार आहे. - टीईटी परीक्षेत घोटाळा झाल्याचे उघड झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने प्रमाणपत्र पडताळणी संबंधित शिक्षकांचे प्रमाणपत्र मागितले आहे.

तर होणार फौजदारी कार्यवाही२०१३ नंतर शिक्षक म्हणून नियुक्त झालेल्या शिक्षकांचे टीईटी प्रमाणपत्र पडताळणी केली जाणार आहे. प्रमाणपत्र घेऊन या शिक्षकांना सोमवार ७ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात सादर करावे लागणार आहे. मात्र प्रमाणपत्र सादर न केल्यास किंवा विलंब केल्यास शिक्षण विभाग संबंधित शिक्षकांवर फौजदारी कार्यवाहीही करणार आहे.

 

टॅग्स :Teacherशिक्षक