शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता जितकी जास्त, तितकी उमेदवारांची धावपळ अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 15:29 IST

कागदपत्रांच्या जोडणीसाठी पाच-सहाजण कामात : अनेकांनी यापूर्वीच केली तयारी

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : ज्याला खरोखरच निवडणूक लढवायची आहे, अशा इच्छुकांना अर्ज भरायला आधी आठ-दहा दिवस धावपळ करावी लागते. कारण त्यात इतकी माहिती द्यावी लागते की, ती कागदपत्रे गोळा करताना अक्षरशः जीव मेटाकुटीला येतो. अर्थात प्रस्थापित राजकीय नेते यासाठी पाच-सहा जणांची 'टीम'च कामाला लावत आहेत. उमेदवाराचे उत्पन्न आणि मालमत्ता जितकी जास्त तितकी धावपळ अधिक असे चित्र आहे.

विधानसभेसाठी अर्ज जरी मोफत मिळत असला तरी अर्ज दाखल करताना १० हजार रुपयांची अनामत रक्कम भरावी लागते. इंग्रजी आणि मराठीमधील हा २८ पानी अर्ज आहे. यातील एक-एक रकाना वरून साधा दिसतो, परंतु त्यातील उत्पन्नाचे रकाने भरताना सीएचीही दमछाक होते. एका एका उमेदवाराची इतकी घरे, फ्लॅट, शेती, बिगरशेती जमीन, औद्योगिक जमीन, सोने, चांदी, हिरे, मोती, वाहने, शेअर्स ही सगळी माहिती द्यावी लागते. इतकेच नव्हे, तर कुठून किती कर्ज घेतले, याचाही तपशील द्यावा लागतो. हे गोळा करण्यासाठी इच्छुक महिनाभरपासूनच कामाला लागले.

बाजारभावाची किंमत द्यावी लागते उमेदवाराने मालमत्ता खरेदी करताना किती किंमत होती, ती विकसित करण्यासाठी काय खर्च केला आणि या मालमत्तेची बाजार भावानुसार किमत किती, याची सविस्तर माहिती उमेदवाराला अर्जामध्ये नमूद करावी लागते. यातूनच जे सातत्याने निवड- णुकीला उभे राहतात. त्यांची पाच वर्षात मालमत्ता किती पट वाढली हेदेखील स्पष्ट होते.

माणसं ठरलेली

  • मागील अनेक वर्षे प्रस्थापितांचे अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेतील माणसं ठरलेली आहेत. 
  • यामध्ये शिक्षक, प्राध्यापक, अक्षर चांगले असलेला आणि आर्थिक साक्षर असलेल्या चार-पाच जणांची टीमच यासाठी नियुक्त असते. 
  • नाहरकत दाखले गोळा करण्यासाठी स्वतंत्र माणूस नेमण्यात येतो. 
  • अनेकांनी लकी माणसांच्याच हातातून अर्ज लिहून घेण्याची प्रथा आहे. 
  • अनेक इच्छुकांनी यापूर्वीच तयारी केली आहे. त्यामुळे धावपळ टळणार आहे.
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४chandrapur-acचंद्रपूर