शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

चंद्रपूर जिल्हा बँकेतील नोकरभरती प्रक्रियेवरील स्थगिती उठविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 14:51 IST

उच्च न्यायालयाचा आदेश : राजकीय हस्तक्षेपाला चाप

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरतीप्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप झाल्याने स्थगिती मिळाली होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने शनिवारी (दि. २८) ही स्थगिती उठवून प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्याचा आदेश दिला. न्यायालयाच्या निर्णयामुळे जिल्हा बँकेची नोकरभरतीची प्रक्रिया पूर्ववत होईल, अशी माहिती जिल्हा बँक प्रशासनाने दिली.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नोकरभरतीच्या मापदंडांबाबत राज्याच्या सहकार विभागाने तपासणी केली होती. त्यानंतरच दि. १७ जुलै २०२४ रोजी ३६० पदांच्या भरतीसाठी परवानगी मिळाली. नोकरभरती कार्यवाही एप्रिल व मे २०२२ मध्ये सुरू करण्यात आली. परंतु राजकीय विरोधकांनी जिल्हा बँकेतील नोकरभरतीला चार वेळा स्थगिती दिली. या स्थगितीविरुद्ध जिल्हा बँकेने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. उच्च न्यायालयाने स्थगिती उठविण्याचा आदेश दिला. त्यानंतर जिल्हा बँकेने नोकरभरतीची प्रक्रिया पुन्हा सुरू केली.

नोकर भरती करणाऱ्या संबंधित एजन्सीबाबत नव्याने वाद निर्माण करण्यात आला. नोकरभरती प्रक्रिया राबविण्यासाठी एजन्सीची तालिका तयार होईपर्यत भरती करू नये असाही युक्तिवाद करून खोडा घालण्यात आला. दरम्यान, बँकेने पुढील सुनावणीपर्यंत नोकरभरतीची प्रक्रिया सुरू ठेवण्यापासून बँकेस परावृत्त करण्याबाबतचे शासनाचे दि. १९ नोव्हेंबर २०२४ रोजीचे पत्र मागे घेण्याबाबत उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यावर शनिवारी (दि. २८) सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायमूर्तीद्वय अविनाश घरोटे व अभय मंत्री यांनी एजन्सी तालिका मुद्दा अमान्य करून नोकर भरतीवरील स्थगिती उठविण्याचा आदेश दिला आहे.

बँकेच्या प्रगतीचा चढता आलेख 

  • राज्यात सहकार विभाग, भारतीय रिझव्ह बँक, नाबार्ड व राज्य सहकारी बँकेचे मापदंड पाळून जिल्हा बँकेने आर्थिक प्रगतीचा आलेख चढता ठेवला. 
  • बँकेचा ढोबळ नफा ९६ कोटी व निव्वड नफा २५ कोटी ९१ लाख आहे. सीआर, एआर १५.४३, बँकेचे नेटवर्क २७६ कोटी असून बँकेची दरवर्षीची उलाढाल ५५०० हजार कोटींच्या वर आहे.
  • बँकेचे भागभांडवल १५० कोटी, बँकेच्या ठेवी ३८०० कोटी, गुंतवणूक २७०० कोटी आहे. लेखा परिक्षणात बँकेला अ श्रेणी आहे. 
  • जिल्हा बँकेचा आकृतीबंध ८८५ मंजूर आहे. दोन वर्षांपासून ४३६ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत.

"चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही एक वित्तीय संस्था आहे. या संस्थेच्या नोकरभरती प्रक्रियेत वारंवार राजकीय हस्तक्षेप करणे आहे. अखेर उच्च न्यायालयाने विरोधकांना चपराक दिली. मी एका राजकीय पक्षाशी निगडित आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवार होतो. त्यामुळे राजकीय आकस ठेवून जिल्हा बँकेतील नोकरभरतीला विरोध करण्यात आला. मात्र देशात अजूनही न्यायव्यवस्था जिवंत आहे. अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी गोंधळून जाऊ नये. ही भरतीप्रक्रिया पारदर्शक व प्रामाणिकपणे पूर्ण होईल." - संतोष सिंह रावत, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, चंद्रपूर

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरbankबँक