शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

पक्षांचे घरे होताहेत उध्वस्त ! माणिकगड पहाडावर होतेय अवैध वृक्षतोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 14:03 IST

वृक्षतोडीवर वेळीच लक्ष देणे गरजेचे : महाराजगुडा परिसरातील जंगल झाले कमी

लोकमत न्यूज नेटवर्क जिवती : डोंगरदऱ्यात, माणिकगड पहाडात वसलेला जिवती तालुका नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे. तालुक्यातील महाराजगुडा या गावालगत जंगो देवी आदिवासी समाजाचे देवस्थान आहे. या देवस्थान परिसरात मोठे जंगल होते. अवैध वृक्षतोडीमुळे आज तेथील जंगलाचे प्रमाण कमी झाले आहे. यासह तालुक्यातील जंगल परिसरात अवैध वृक्षतोडीचे प्रमाण वाढल्याने माणिकगड पहाडावरील घनदाट जंगलाचे प्रमाण कमी होऊन घनदाट जंगलाचे सौंदर्य धोक्यात आले आहे. तसेच दिवसेंदिवस कमी होत असलेले जंगलाचे प्रमाण मानवी जीवनासाठीही धोक्याची घंटा असल्याने याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

मानवी जीवनातील असंख्य संकटे ही निसर्गावर अवलंबून आहेत. कोरोना काळात ऑक्सिजनअभावी अनेक जीव गेले. झाडांमुळे आक्सिजन मिळते, हे सर्वांना माहीत असून देखील कुणीही या झाडांची किंमत करत नाहीत. पाऊस का चांगला होत नाही, नदी, नाले, तलाव तुडुंब का भरत नाहीत, हवामान बदल का होत आहे, जंगलातील प्राणी जंगलातच का राहत नाहीत, पशुपक्त्यांची झाडावरची घरटी कुठेही आता का दिसत नाही, पहाटेच्या वेळी चिमण्यांचा किलबिलाट का कमी झाला यासारख्या अनेक समस्या व प्रश्न मानवाने आपल्या सोयीसाठी जंगलतोड करून स्वतःहून निर्माण केल्यात. ही स्थिती आता जिवती तालुक्यातही पाहायला मिळत आहे. 

अन्यथा पहाडावरील सौंदर्य येऊ शकते धोक्यात

  • येणारी पुढील पिढी झाडांच्या सान्निध्यात जगविण्यासाठी झाडे लावून संवर्धन करणे हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे सर्वांनी अवैध वृक्षतोड न करता झाडे लावण्याची चळवळ उभी केल्यास पर्यावरणाचे रक्षण होईल. 
  • मात्र असे होताना दिसून येत नाही. तालुक्यात जंगल परिसरात अवैध वृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे. दक्षता विभाग नावापुरता शिल्लक आहे. 
  • दिवसाढवळ्ळ्या होणारी झाडांची कत्तल रोखून वन गुन्हेगाराचे आक्रमण नाही थोपविल्यास माणिकगड पहाडावरील घनदाट जंगलाचे सौंदर्य धोक्यात येणार हे नक्की. याकडे संबंधित विभागाने जातीने लक्ष देण्याची गरज आहे.
टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरNatureनिसर्ग