शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

हिरवा चारा पुरात झाला नष्ट, कोरडा चारा केव्हाच संपला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2022 5:00 AM

जिल्ह्यातील मोठ्या नद्या असलेल्या वर्धा, वैनगंगा यासह इरई, झरपट नदी  नाल्यांना दोन ते तीन वेळा पूर  आला. अजूनही परिस्थिती पूर्वपदावर आली नाही. पुराच्या पाण्यामध्ये पिकांचे नुकसान झाले. यासोबतच हिरवा चारा सडला, त्यामुळे सध्या पूरग्रस्त गावांतील नागरिकांना जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न पडला आहे.  शेतातील पीकही वाया गेले असून दुबार पेरणी करावी लागणार आहे. यासात्री मात्र किमान एक ते दीड महिना वाट बघावी लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दाणादाण उडविली आहे.  नदी-नाल्यांना पूर आला असून, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली. त्यामुळे शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले. यातच आता चारा टंचाईला जिल्ह्यातील विशेषत: भद्रावती, राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. मुक्या जनावरांना जगवायचे तरी कसे, अशी चिंता त्यांना सतावत आहे.जिल्ह्यातील मोठ्या नद्या असलेल्या वर्धा, वैनगंगा यासह इरई, झरपट नदी  नाल्यांना दोन ते तीन वेळा पूर  आला. अजूनही परिस्थिती पूर्वपदावर आली नाही. पुराच्या पाण्यामध्ये पिकांचे नुकसान झाले. यासोबतच हिरवा चारा सडला, त्यामुळे सध्या पूरग्रस्त गावांतील नागरिकांना जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न पडला आहे.  शेतातील पीकही वाया गेले असून दुबार पेरणी करावी लागणार आहे. यासात्री मात्र किमान एक ते दीड महिना वाट बघावी लागणार आहे. त्यामुळे शासनाने लक्ष देऊन जनावरांच्या चाऱ्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी  आहे.  

जनावरांना जगवण्याचा प्रश्नपूरग्रस्त गावातील शेतकऱ्यांना जनावरांना जगविणे कठीण झाले आहे. कोरडा चारा पावसाच्या दिवसामध्ये संपला असून, पूर आल्यामुळे शेतातील हिरवा चारा नष्ट झाला आहे. त्यामुळे जनावरांना जगविण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. आता पूर ओसरला आहे. मात्र, चिखलामुळे शेतात जाणे कठीण झाले आहे.

सर्वत्र राखेचा थरकाही वर्षांपूर्वी पुराच्या पाण्यात शेती आली तरीही शेतकऱ्यांचे फारसे नुकसान होत नव्हते. शेतामध्ये नदीतील पाण्यासोबत वाहून आलेल्या मातीमुळे शेती सुपीक होत होती. यावर्षी मात्र विशेषत: भद्रावती तालुक्यात पुराच्या पाण्यामध्ये राख आल्याने शेतामध्ये सर्वत्र राख पसरली आहे. यामुळे शेती नापीक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कुटार संपलेबहुतांश शेतकरी पावसाची सोय म्हणून कुटार भरून ठेवतात. यावर्षी  सतत कोसळलेल्या पावसामुळे जनावरांना घरीच बांधून ठेवावे लागले. यामध्ये कोरडा चारा संपला आहे. 

गवत सडून झाले नष्ट शेकडो हेक्टर जमीन पुराच्या पाण्याखाली आहे. त्यामुळे गवत सडून नष्ट झाले आहे. दुसरीकडे शेत परिसरात सर्वत्र चिखल असल्याने जनावरांना शेतात नेतासुद्धा येत नसल्याची स्थिती आहे.

पुराच्या पाण्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या शेतकऱ्यांना चाराटंचाईचा सामना करावा लागत आहे. मुक्या जनावरांना कसे जगवायचे, हा प्रश्न पडला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. शासनाने शेतकऱ्यांना मदत करून धीर देण्याची गरज आहे. - संदीप खुटेमाटेअध्यक्ष, अन्नदाता एकता मंच

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर