शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

गोंडपिपरी-खेडी राज्य महामार्ग झाला आहे अक्षरश: मरणमार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2022 05:00 IST

कंत्राटदाराने दिरंगाईच्या आरोपातून बचावात्मक पवित्रा घेत जलदगतीने काम करण्याच्या नादात रस्त्याच्या दोन्ही बाजूस गिट्टी पसरवून ठेवली. या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे मरणयातनाच. कंत्राटदाराकडून दिरंगाई व गुणवत्तेची तपासणी करावी. मार्गाचे काम  लवकर पूर्ण करून दिलासा द्यावा, अशी मागणी  या मार्गाने प्रवास करणाऱ्यांकडून होत आहे.

वेदांत मेहरकुळे लोकमत न्यूज नेटवर्कगोंडपिपरी :  गेल्या अनेक वर्षांपासून नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या गोंडपिपरी - मूल या मार्गाला सध्या मरणवाटेचे स्वरुप आले असून, या मार्गावर सुरू असलेल्या अपघातांच्या मालिकेत अनेक जणांचा जीव गेला आहे. या मार्ग निर्मितीचे काम सलग तीन वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. तसेच मार्ग निर्मितीच्या कामात कंत्राटदाराने दोन्ही बाजूस गिट्टी पसरल्याने येथील प्रवाशांना रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अपघाताची दाट शक्यता बळावली आहे.गोंडपिपरी शहराच्या उत्तरेकडे जाणाऱ्या गोंडपिपरी खेडी हा मार्ग मूल - नागपूर या महामार्गाला जोडणारा मार्ग म्हणून अस्तित्त्वात आला. सुरुवातीला एकेरी मार्ग असताना या मार्गावरून होणाऱ्या वाहतुकीत प्रचंड वाढ झाल्याने या मार्गाचे दुहेरी मार्गात रूपांतर झाले होते. त्यानंतरच्या काळात दिवसागणिक वाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने मागील पंचवार्षिक भाजप सरकारने हायब्रीड योजनेंतर्गत कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून देऊन नूतनीकरणातून त्रिपदरी मार्ग करण्यासाठी सत्ताकाळ संपुष्टात येण्याच्या तोंडावर मोठ्या लगीनघाईने कामाचे उद्घाटन करण्यात आले होते. कामाचे कंत्राट एसआरके हैदराबाद या कंपनीला मिळताच मार्गाचे एका बाजूचे खोदकाम करून ठेवले. यानंतर मात्र सलग दोन वर्षापर्यंत या मार्गावर केवळ निर्मिती कामाचा टेंभा मिरवून थातूरमातूर खड्डे बुजवले. शासनाच्या डोळ्यात धूळफेक करून मार्ग निर्मितीचे काम सुरू असल्याचे भासविले गेले.

न्यायालयात याचिकाही दाखलअशातच तालुक्यातील करंजी येथील एसटी महामंडळातील वाहन चालक कर्तव्यावरून गावाकडे येताना दुचाकीचा अपघात होऊन जागेवरच मरण पावला. तसेच खेडी मार्गावर पंचायत समितीचे माजी सभापती संजय मारकवार यांचेही अपघाती निधन झाले. कंत्राटदाराच्या या दिरंगाई धोरणाचा विरोध करीत स्थानिक मार्गावरील नांदगाव येथील सरपंच वाकुडकर यांनी वारंवार तक्रार करूनही बांधकाम विभागाला जाग न आल्याने थेट न्यायालयात याचिका दाखल करून संबंधित कंत्राटदारावर कारवाईची मागणी केली होती.

कामाची तपासणी करावीकंत्राटदाराने दिरंगाईच्या आरोपातून बचावात्मक पवित्रा घेत जलदगतीने काम करण्याच्या नादात रस्त्याच्या दोन्ही बाजूस गिट्टी पसरवून ठेवली. या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे मरणयातनाच. कंत्राटदाराकडून दिरंगाई व गुणवत्तेची तपासणी करावी. मार्गाचे काम  लवकर पूर्ण करून दिलासा द्यावा, अशी मागणी  या मार्गाने प्रवास करणाऱ्यांकडून होत आहे.

राज्य महामार्ग क्र.१३९  चे निर्मिती कार्याची पाहणी दरम्यान योग्य नसलेले काम परत फोडून नव्याने करण्यास कंत्राटदाराला आदेश दिले आहे. तसेच सदर काम गुणवत्ता दर्जा नुसारच पूर्ण होईल.- अनंत भास्करवार कार्यकारी अभियंता सा. बां. विभाग २ चंद्रपूर.

 

टॅग्स :highwayमहामार्ग