शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

आजोबाच्या अंत्यसंस्काराला आलेल्या नातवाचीही निघाली अंत्ययात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2022 16:02 IST

आजोबाचा मृतदेह घरी असताना अशा बिबट्या हल्ल्याच्या विचित्र घटनेतून त्याच दिवशी आठ वर्षीय नातवाचाही मृत्यू झाल्याने संबंधित कुटुंबावर शोककळा पसरली.

ठळक मुद्देआजोबाच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातवाला बिबट्याने नेऊन केले ठार एकाच स्मशानभूमीत झाले दोघांवर अंत्यसंस्कार

अजिंक्य वाघमारे

दुर्गापूर (चंद्रपूर) : आजोबाच्या अंत्यसंस्कारासाठी बाहेर गावावरून आलेल्या नातवाला बिबट्याने ठार केल्याने आजोबाच्या घरून सोबतच नातवाचीही एकाच वेळेस अंत्ययात्रा काढण्यात आली. एकाच वेळी ऊर्जानगर नेरी येथील स्मशानभूमीत दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या हृदयद्रावक घटनेने उपस्थितांना अश्रू अनावर झाले होते.

ऊर्जानगर नेरी येथील समता नगरात बुधवारी तेजराम मेश्राम यांचे वृद्धापकाळाने निधन झाले होते. त्यांचा नातू प्रतीक बावणे हा आपल्या आईसह भद्रावती येथून आला होता. लांबून आणखी काही नातेवाईक येणार असल्याने बुधवारी होणारे अंत्यसंस्कार गुरुवारी करण्यात येणार होते. अंत्यसंस्कारासाठी आलेले सर्व नातेवाईक शोकाकुल वातावरणात घरी बसले होते. रात्री आठ ते नऊच्या सुमारास येथे आलेल्यापैकी काही मुले व नातवंडे हे घरामागे गप्पा गोष्टीत मग्न होते. अशातच एक बिबट्या दबा धरून बसला असल्याची यत्किंचीतही कल्पना या मुलांना नव्हती. यापैकी प्रतीक बावणेवर बिबट्याने काही कळायच्या आत पाठीमागून हल्ला केला व काळाचा घाला पडला. त्याच्या मानेचा घोट घेत त्याला ओढत लगतच्या झाडाझुडपात नेऊन ठार केले.

आजोबाचा मृतदेह घरी असताना अशा बिबट्या हल्ल्याच्या विचित्र घटनेतून त्याच दिवशी आठ वर्षीय नातवाचाही मृत्यू झाल्याने संबंधित कुटुंबावर शोककळा पसरली. बुधवारी दिवसाच आजोबांवर अंत्यसंस्कार झाले असते तर कदाचित आजोबासोबत नातवाची अंत्ययात्रा निघाली नसती. अखेर नियतीने डाव साधला. नातू आजोबाच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्याकरिता आला. मात्र, आजोबासोबत नातवाचीही अंत्ययात्रा काढावी लागली. यावेळी अंत्यविधीत सहभागी प्रत्येक नागरिकाचे डोळे पाणावले होते.

अत्यंत शोकाकुल अशा वातावरणात ऊर्जानगर नेरी येथील स्मशानभूमीत नातवाला मूठमाती देऊन पुरण्यात आले तर आजोबाला अग्नी देऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Deathमृत्यूleopardबिबट्याchandrapur-acचंद्रपूर