शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आली आली निवडणूक आली, शस्त्र जमा करण्याची वेळ झाली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 14:46 IST

पोलिस अधीक्षकांचे आदेश धडकले : ५४२ पैकी ३९० जणांनी केले शस्त्र जमा

परिमल डोहणे लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागताच निवडणूक निर्विघ्न पार पाडण्यासाठी परवानाधारक शस्त्रे जमा करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिले आहेत. आदेश धडकताच जिल्ह्यातील ५४२ पैकी ३९० शस्त्रे संबंधित पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत. शिल्लक १५२ शस्त्रे जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. पोलिस ठाण्यात जमा करण्यात येणारी ही अग्निशस्त्रे आचारसंहिता संपल्यानंतर परत देण्यात येणार आहेत.

राजकारणी असो की मोठे व्यावसायिक याशिवाय विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी यांच्याकडून स्वरक्षणासाठी शस्त्र परवाना काढला जातो. हा शस्त्र परवाना जिल्हा प्रशासन व पोलिस अधीक्षक यांच्यामार्फत गृहविभागाच्या परवानगीने दिले जातात. 

चंद्रपूर जिल्ह्यात ५४२ जणांनी शस्त्र परवाने घेतले आहेत. सध्या विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता जाहीर झाली आहे. निवडणूक काळात राजकीय वाद-विवाद, वैमनस्य उफाळून येण्याची शक्यता असते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्या संयुक्त समितीने पिस्तूल, रायफल व इतर अग्निशस्त्र जमा करून घेण्याचे निर्देश सर्व ठाणेदारांना दिले आहेत. प्रामुख्याने निवडणूक काळातील दंगलीत थेट सहभागी, गुन्हे दाखल झालेले या वर्गवारीतील तसेच परवानाधारकांची अग्निशस्त्रे जमा करून घेण्यात येणार आहे. तसेच त्यांचे पोलिस रेकॉर्डदेखील पाहण्यात येणार आहे. बँक व वित्तीय संस्थांत कार्यरत सुरक्षारक्षक यांची अग्निशस्त्रे जमा करण्यात येणार नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. आजपर्यंत ५४२ पैकी ३९० जणांनी संबंधित ठाण्यात शस्त्र जमा केले आहेत.

तर घ्यावी लागेल परवानगी जिल्ह्यात ५४२ जणांनी आत्मसंरक्षणार्थ शस्त्रांचा परवाना १. घेतला आहे. ज्या व्यक्तींना स्वसंरक्षणासाठी जवळ शस्त्र बाळगण्याशिवाय पर्यायच नाही, अशा व्यक्तींना शस्त्र ठेवण्याची मुभा दिली जाते. त्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या छाननी समितीपुढे अर्ज करून याबाबत सबळ पुरावे द्यावे लागणार आहेत. २. समितीच्या वतीने तपासणी केल्यानंतर त्यांना शस्त्र • बाळगण्याची परवानगी देण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस चार जणांनी अशी परवानगी मागितली होती. 

"निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या अनुषंगाने शस्त्र जमा करण्यात येत आहेत. यासंदर्भात प्रत्येक ठाणेदारांना सूचना दिल्या असून, दररोज आढावा घेणे सुरू आहे. सद्यः स्थितीत ३९० च्या जवळपास शस्त्र जमा करण्यात आली आहेत. ज्यांना आत्मसंरक्षणासाठी शस्त्र ठेवायचे आहे, त्यांना पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांच्या गठित समितीकडे अर्ज सादर करावा लागणार आहे. त्यानंतर ती समिती निर्णय घेऊन परवानगी देणार आहे."- मुम्मका सुदर्शन, पोलिस अधीक्षक, चंद्रपूर

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४chandrapur-acचंद्रपूरCode of conductआचारसंहिता