शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा प्रशासन करणार व्हिडीओ गेम पार्लरचा ‘गेम’

By राजेश मडावी | Updated: September 21, 2023 16:27 IST

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश : तहसीलदार व ठाणेदारांची पथके गठित

चंद्रपूर : शहरात व्हिडीओ गेम पार्लरच्या नावाखाली जुगाराचा डाव सुरू असल्याची बाब 'लोकमत'ने प्रकाशित करताच रामगनर पोलिसांनी बुधवारी राजवीर व्हिडीओ पार्लरवर धाड टाकली. या कारवाईने अवैधरीत्या व्हिडीओ गेम पार्लर चालविणाऱ्या सट्टेबाजांचे धाबे दणाणले असतानाच आता जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दखल घेऊन व्हिडीओ गेम पार्लरचा गेम करण्यासाठी तहसीलदार व ठाणेदारांची पथके गठित करण्याचा आदेश जारी केला.

मनोरंजनाच्या नावाखाली प्रशासनाची परवानगी न घेता चंद्रपुरात व जिल्हाभरात सर्रास जुगार सुरू आहे. त्यामुळे युवापिढी या जुगाराच्या नादी लागली. अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. शाळेकरी मुलेही याला बळी लागली. 'लोकमत'ने लक्षवेधी वृत्त प्रसिद्ध करताच पोलिस अधीक्षकांच्या निर्देशानुसार पोलिस उपनिरीक्षक दीपेश ठाकरे यांच्या नेतृत्त्वात रामनगर पोलिसांनी सपना टाॅकीज चौकातील राजवीर व्हिडीओ पार्लरवर धाड टाकून आरोपी विनोद संकत याला मुद्देमालासह अटक केली. जिल्हाभरात मोठ्या प्रमाणावर विनापरवाना व्हिडीओ गेम पार्लरमध्ये जुगार खेळला जातो, याची कुणकुण जिल्हाधिकारी विनय गौडा यांना लागली. त्यांनी या व्हिडीओ गेम पार्लरची चौकशी करण्यासाठी सर्व तहसीलदार व ठाणेदारांची हद्दनिहाय पथके गठित करण्याचा आदेश दिला आहे.

अशी होणार चौकशी

परवान्याच्या जागेत बदल झाला आहे काय,परवान्यात नमुद वेळ पाळली जाते काय, परवान्यात दर्शविलेल्या संख्येइतकेच मशीन परवानास्थळी आहेत किंवा कसे, परवानास्थळी काही इतर अवैध व्यवसाय चालतात काय, याव्यक्तीरिक्त परवान्यातील अटी व शर्तींचे होते की कसे याची चौकशी संबंधित तहसीलदार व ठाणेदारांचे पथक चौकशी करणार आहे. चौकशीत दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchandrapur-acचंद्रपूर