शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
4
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
5
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
6
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
7
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
8
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
9
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
10
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
11
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
12
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
13
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
14
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
15
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
16
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
17
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
18
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
19
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
20
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग

नागपुरात दोनदा फसला हाजी सरवरला संपविण्याचा कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 13:59 IST

गोळीबार प्रकरण : गुन्हेगारांच्या टोळ्यांवर करडी नजर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील बिनबा गेट परिसरातील हॉटेल शाही दरबारमध्ये कुख्यात गुंड शेख हाजी बाबा शेख सरवर याच्यावर गोळ्या झाडून, चाकूने गळा चिरून सोमवारी हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे. हाजी सरवरला नागपुरातच संपविण्याचा कट समीरने व त्याच्या साथीदारांनी रचला होता.

दोनदा तसे प्रयत्नही करण्यात आले. परंतु, हे प्रयत्न फसले. मात्र तिसऱ्यांदा कोणत्याही परिस्थितीत सरवरचा गेम करायच्या इराद्याने समीर व त्याचे साथीदार आदल्या दिवशीच चंद्रपुरात दाखल झाले. अचूक संधी साधून सरवरची हत्या केली, अशी माहिती तपासात पुढे आल्याची माहिती पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिली. हाजी सरवरच्या हत्या प्रकरणात घटनेच्या दिवशीच समीर शेख, श्रीकांत कदम, नीलेश ऊर्फ पिंटू ठगे, प्रशांत मालवेली, राजेश मुलकलवार या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

गोळीबार झाल्यानंतर घटनास्थळावरून पसार झालेल्या सुरेंद्र यादवला पोलिसांनी नागपुरात पथक पाठवून अटक केली. हे सर्व आरोपी पोलिस कोठडीत आहेत. या घटनेनंतर पोलिस गुन्हेगारांच्या टोळ्यांवर करडी नजर ठेवून असल्याची माहिती आहे.

सीडीआर उलगडणार का हत्येचे गूढ?पैशाची देवाण-घेवाण, गुन्हेगारीतील वर्चस्व, यासह काही वैयक्तिक कारणातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी आरोपींचा सीडीआर व डीसीआर घेतला आहे. यातून हत्येचे नेमके गूढ काय आहे, या दृष्टीनेही पोलिस तपास करीत आहेत.

हत्येमागे पुन्हा एकजण हाजी सरवरच्या हत्येदरम्यान सातजण घटनास्थळी होते. त्यापैकी सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर एकजण फरार आहे. आरोपीना हत्येसाठी नागपुरातून शस्त्र पुरवठा करण्यात आल्याची माहिती आहे. त्या अनुषंगाने शस्त्र पुरवठा करणाऱ्या आठव्या आरोपींचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरCrime Newsगुन्हेगारी