लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : घरबांधणीचा खर्च कमी व्हावा, म्हणून केंद्राने ३ सप्टेंबरला सिमेंटवरील जीएसटी १० टक्के कमी करून १८ टक्क्यांवर आणण्याची घोषणा केली. २२ सप्टेंबरपासून त्याची अंमलबजावणी होण्याआधीच सिमेंट कंपन्यांनी सिमेंटचे दर २५ ते ३० रुपयांपर्यंत वाढवले आहेत; यामुळे जीएसटी कपातीचा ग्राहकांना किती लाभ मिळेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सिमेंटचे दर कमी होऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळावा यासाठी सिमेंटचे दर कमी होऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळावा तसेच बांधकाम करणाऱ्यांचा खर्च कमी करण्यासाठी शासनाने सिमेंटवरील जीएसटी १० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, प्रत्यक्षात होलसेलबरोबर किरकोळचे दरही वाढल्याची स्थिती आहे. जवळपास २० ते २५ रुपयांनी सिमेंटची गोणीत वाढ केली जात आहे. त्यामुळे या निर्णयाचा ग्राहकांना किती दिलासा मिळेल, हे पाहणे उत्सुकतेचे आहे.
गोणीमागे सिमेंट दर २० ते २५ रुपयांनी वाढवले
२२ सप्टेंबरपासून १८ टक्के जीएसटी लागू होणार असला तरी सिमेंट उत्पादकांनी आधीच २० ते २५ रुपये प्रतिगोणी दरवाढ केली आहे. यामुळे ग्राहकांना जीएसटी कपातीचा अपेक्षित लाभ मिळणार नाही.
ग्राहकांचा झाला असता इतका फायदा
शासनाच्या निर्णयामुळे सिमेंटचे दर कमी होतील. यामुळे घरबांधणीचा खर्च कमी होईल अशी अपेक्षा होती; पण कंपन्यांनी जीएसटी कपात लागू होण्यापूर्वीच दर वाढवले. त्यामुळे ग्राहकांना फायदा कमीच होण्याची शक्यता आहे.
शहरात दरमहा लाखो गोण्यांचा खप
दिवसेंदिवस बांधकामाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सिमेंटची मागणी वाढली आहे. शहरात दरमहा लाखो सिमेंट गोण्यांचा खप होतो. शिवाय जिल्ह्यातील इतर भागांतून शहरातील विविध सिमेंट दुकानातून ग्राहक खरेदीसाठी येतात. तर काहीजण कोरपना तालुक्यात असलेल्या कंपनीतून थेट सिमेंट खरेदी करत असतात.
सिमेंटवरील जीएसटी २८ वरून १८ टक्के
केंद्र सरकारने सिमेंटवरील वस्तू आणि सेवाकर २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर कमी करण्याचा निर्णय घेताना आहे. या निर्णयामुळे सिमेंटचे दर कमी होऊन घरबांधणीचा खर्च कमी होईल, अशी अपेक्षा होती. मा. सद्यस्थितीत २० रुपये एका गोणीमागे दरवाढ झाल्याची स्थिती आहे.
जुन्या स्टॉकचा बहाणा
अनेक ठिकाणी काही विक्रेते जुन्या स्टॉकचे कारण सांगत आहेत. २२ सप्टेंबरपासून जीएसटी कपात लागू होईल; परंतु अनेक विक्रेते जुना स्टॉक असल्याचे कारण देऊन दरवाढ कायम ठेवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरवाढीकडे लागले आहे लक्ष
केंद्र सरकारने जीएसटी कमी केल्याचा घेतलेल्या निर्णयामुळे जनसामान्यांमध्ये आनंद निर्माण झाला आहे. यामुळे ग्राहकांना जीएसटी कपातीचा लाभमिळणार आहे. त्यामुळे हा निर्णय २२ तारखेनंतर लागू होणार असून कंपन्यांकडून दरवाढ किती जाहीर केली जाणार आहे, याकडे लक्ष लागले आहे.