शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

१५ गावांचा डोलारा एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 16:53 IST

राजोली प्राथमिक आरोग्य केंद्र : रुग्णांची होतेय गैरसोय

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : जनतेच्या आरोग्यविषयक समस्या सोडविण्यासाठी मूल तालुक्यातील राजोली प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत निर्माण करण्यात आली. इमारत झाल्यावर रिक्त पदे भरली जातील, असा आशावाद जनतेत होता. मात्र, वर्ष लोटत असताना देखील रिक्त पदांचे ग्रहण सुटता सुटत नसल्याचे चित्र आजही कायम आहे. त्यामुळे १५ गावांचा भार पेलवता पेलवत नसून एकच वैद्यकीय अधिकारी हा भार सांभाळत आहे. त्यामुळे जनतेत नाराजीचा सूर उमटत आहे. यासाठी रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक झाले आहे.

ग्रामीण भागात जनतेला आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत असल्याने त्यांना लांब अंतरावर जाऊन उपचार करणे कठीण असते. यासाठी गावाजवळच उपचार करता यावा, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. मूल तालुक्यातील राजोलीअंतर्गत १५ गावे येत असून, यात राजोली, डोंगरगाव, चिखली, चितेगाव, बेलघाटा, तसेच नवेगाव, लोन खैरी, मुरमाडी, ताडभूज व गोलभूज या जंगलव्याप्त गावांचा समावेश आहे. या गावातून रुग्ण उपचार करण्यासाठी येत असतात. त्यांना योग्य उपचार होण्याच्या दृष्टीने वैद्यकीय यंत्रणा सज्ज आहे. मात्र, आता या यंत्रणेला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे.

परिचारिक, शिपाई, औषधी सहायकही नाहीवैद्यकीय अधिकारी असेल तरी परिचारिका, शिपाई व औषधी सहाय्यक ही पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. औषधी सहायक पद रिक्त असल्याने कुठली औषधी आणायची, याचा ताळमेळ नाही. त्यामुळे रुग्णांना आवश्यक असलेली औषधी मिळत नसल्याचे दिसून येत आहे. परिचारिकेचे पद रिक्त आहे. देखभाल व इतर माहितीसाठी शिपाई पद रिक्तच आहे. त्यामुळे त्याचाही भार एकूण वैद्यकीय प्रशासनावर पडत आहे. त्यामुळे ग्रामीण जनतेला योग्य उपचार करण्यासाठी रिक्त पदांचे ग्रहण हटविण्याची मागणी जनतेनी केली आहे.

"प्राथमिक आरोग्य केंद्र, राजोली येथे यापूर्वी दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते. मात्र, त्यांची बदली झाल्याने नव्याने अजिंक्य पेशेट्टीवार रुजू झाले आहेत. ते योग्य उपचार करीत आहेत. मात्र, एका वैद्यकीय अधिकाऱ्यांना अतिरिक्त भार पडत आहे. त्यामुळे तातडीने वैद्यकीय अधिकारी पद भरणे आवश्यक आहे. तसेच रुग्णकल्याण समितीची गेल्या आठ महिन्यांपासून सभा होत नसल्याने वैद्यकीय आरोग्यासंदर्भात समस्या मांडता येत नसून त्वरित तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सभा आयोजित करणे आवश्यक आहे."- जितेंद्र लोणारे, सरपंच, ग्रामपंचायत राजोली.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरhospitalहॉस्पिटल