शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
2
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
3
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
4
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
5
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
6
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
7
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
8
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
9
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
10
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
11
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
12
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
13
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
14
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
15
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
16
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
17
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
18
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
19
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
20
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
Daily Top 2Weekly Top 5

महसूल कर्मचाऱ्यांच्या संपाने प्रशासकीय यंत्रणा कोलमडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 14:13 IST

Chandrapur : हजारो दाखले अडकले; सोमवारपासून बेमुदत संप

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व शाळा-महाविद्यालय प्रवेशासाठी विविध दाखले काढण्यास तहसील कार्यालयात मोठी गर्दी असतानाच शुक्रवारी महसूल कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले. त्यामुळे महसुली यंत्रणा कोलडली. हजारो दाखले अडकल्याने लाडक्या बहिणींसह विद्यार्थ्यांची चिंता वाढली. दरम्यान, राज्य महसूल कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून लक्ष वेधले. सोमवार दि. १५ पासून कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत.

राज्य सरकारने १ जुलैपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कार्यान्वित केल्याने तहसीलदार उत्पन्नाचा दाखला व अधिवास प्रमाणपत्रासाठी महिलांची झुंबड उडाली. सेतू केंद्रावर महिलांची गर्दी होती. त्यामुळे महाऑनलाइनच्या साइटवर भार पडल्याने सेतू केंद्रातील साइटवर अडचण निर्माण झाली. योजनेसाठी लागणारे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दाखले हे एकाच वेळी टाकले गेल्याने तालुका प्रशासनाच्या डेक्सवर पेंडिंग दाखल्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे.

महाऑनलाइनच्या साइटवर तहसीलदार डेस्कवर तांत्रिक खोडा निर्माण झाला. साइट विलंबाने चालत असल्याने दाखल्यांसाठी सेतू केंद्रात चकरा मारणे सुरू आहे. त्यातच महसूल कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार पुकारले. त्यामुळे एकट्या मूल तालुक्यात ३ हजार उत्पन्न प्रमाणपत्र पेंडिंग अडकले आहेत. जिल्ह्यात हा आकडा १५ हजारांच्या पुढे असल्याची माहिती सूत्राने दिली.

सर्व ऑनलाइन सेवा ठप्पतोहोगाव: डिजिटल इंडियाद्वारे सर्व ग्रामपंचायती ऑनलाइन जोडल्या. मात्र सॉफ्टवेअर कंपनीचा करार संपुष्टात आल्याने डिजिटल सेवा पुरती कोलमडली आहे. विविध दाखले, करभरणा करणे, यासह १ ते ३३ नमुना जतनासह ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगाचा खर्च करणे अवघड झाले आहे. नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. राज्य शासनाने ई- गव्हर्नन्स, ई-पंचायत कार्यक्रमाची अंमलबजावणी ग्रामविकास विभागाद्वारे केली.

ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबर्स नेटवर्कने ब्रॉडबैंड इंटरनेट कनेक्शनद्वारे जोडणे सुरू झाले. दरम्यान, सीएससीपीव्ही सॉफ्टवेअर कंपनीमार्फत ग्रामपंचायतींना ऑनलाइन सुविधांसाठी विविध संगणकीय प्रणाली, अॅप व पोर्टल विकसित करून दिले होते. कंपनीसोबतचा करार संपला. त्यामुळे ग्रामपंचायत मधील ऑनलाइन सर्व कामे बंद पडली आहेत.

अशा आहेत मागण्या■ दांगट समितीच्या अहवालातील शिफारशी लागू करून आकृतिबंध तात्काळ लागू करा, अव्यल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गातून नायबतहसीलदार म्हणून पदोन्नती द्यावीख महसूल विभागातील आकृतिबंध लागू करावी, महसूल कर्मचायांचे सुधारित वेतन निश्चित करावे, नायब तहसीलदारपद राजपत्रित असूनही वेतन वर्ग तीननुसार दिले जाते.■ यामध्ये बदल करून ४ हजार ८०० रुपये करावे, आदी मागण्या संघटनेने पुढे केल्या. जिल्हा पात- ळीवरील आंदोलनाचे नेतृत्व महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शैलेंद्र धात्रक, उपाध्यक्ष अजय मेकलवार, मनोज आकनुरवार, नितीन पाटील, अमोल आखाडे, सोनाली लांडे, दीपिका कोल्हे, स्मिता डांगरे, अजय खनके, नरेंद्र खांडेकर, राकेश जांभुळकर, महेश बाबरसुरे, विष्णू नागरे, सुनिल चांदेवार, विजय उईके, प्रशांत रेभानकर आदी करीत आहेत. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर