लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : दहा वर्षांपूर्वी माथरा येथे पाणीपुरवठा नळयोजनेच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. मात्र अल्पावधीतच या नळयोजनेला ग्रहण लागल्याने शासनाने लाखो रूपयाचा खर्च करूनही गावकऱ्यांना आजतागायत पाण्याचा एक थेंबदेखील मिळाला नाही. याला दहा वर्षांचा प्रदीर्घ कालावधी लोटला आहे. पाण्याच्या टाकीचे बांधकाम अर्धवट असल्याने बांधकाम पूर्ण करून संबंधित विभाग माथरावासीयांची तहान केव्हा भागविणार,असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.राजुरा तालुक्यातील माथरा गाव तालुकास्थळापासून सहा किमी अंतरावर वसले आहे. जवळपास ८०० लोकसंख्या असलेल्या गावात पाण्याची टंचाई लक्षात घेता पेयजल योजनेतून १० वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्चून पाण्याची टाकी बांधली. मात्र अल्पावधीतच या योजनेला ग्रहण लागल्याने टाकीचे बांधकाम अर्ध्यावरच रखडले. येथील सरपंच लहुजी चहारे यांनी व गावकऱ्यांनी टाकीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाला अनेकदा निवेदन दिले. मात्र बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही. परिणामी माथरावासीयांना पाण्यासाठी भटकंती करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.माथरा गवात आजघडीला सहा सरकारी हातपंप आहेत. परंतु पाण्याची पातळी खाली गेल्याने हातपंपांनाही नियमित पाणी येत नाही. या परिसरातील पाण्याची पातळी कमालीची खालाविल्याने हे हातपंप अखेरच्या घटका मोजत आहे. नदी, नाले, तलाव, बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. गावकºयांची पाण्यासाठी पायपीट सुरू झाली आहे. माथरा येथे पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू झाल्याने पाणी नळयोजनेच्या माध्यमातून घरापर्यंत पोहचेल म्हणून गावकरी समाधानी होते. परंतु ही पाणीपुरवठा नळयोजना अल्पावधीतच रखडल्याने नागरिकांच्या चेहºयावरचा आनंद फार काळ टिकला नाही.माथरा येथे पाणी टंचाई जाणवायला सुरूवात झाली आहे. गावातील पाण्याचे स्त्रोत आटायला लागल्याने नागरिकांना पाण्यासाठी धडपड करावी लागत आहे. १० वर्षांपासून पाणीपुरवठा नळयोजनेचे काम अपूर्ण असून संबंधित विभागाने टाकीचे काम पूर्ण करून गावकºयांसाठी नळयोजना कार्यान्वित करावी.-लहुजी चहारे, सरपंच, माथरा
दहा वर्षांपासून पाणीपुरवठा योजना रखडलेलीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:04 IST
दहा वर्षांपूर्वी माथरा येथे पाणीपुरवठा नळयोजनेच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. मात्र अल्पावधीतच या नळयोजनेला ग्रहण लागल्याने शासनाने लाखो रूपयाचा खर्च करूनही गावकऱ्यांना आजतागायत पाण्याचा एक थेंबदेखील मिळाला नाही.
दहा वर्षांपासून पाणीपुरवठा योजना रखडलेलीच
ठळक मुद्देअर्धवट बांधकाम : बांधकाम विभाग लक्षच देईना !