शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर, ब्रह्मपुरीतील शासकीय तंत्रनिकेतन करणार तांत्रिक लेखापरीक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:34 IST

चंद्रपूर : महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायतीकडून शहरात विविध पायाभूत सुविधा पुरविल्या जातात. मात्र, बऱ्याचदा कामांचा दर्जा निकृष्ट असूनही स्थानिक ...

चंद्रपूर : महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायतीकडून शहरात विविध पायाभूत सुविधा पुरविल्या जातात. मात्र, बऱ्याचदा कामांचा दर्जा निकृष्ट असूनही स्थानिक स्वराज्य संस्थांवर कारवाई होत नाही. चंद्रपूर जिल्ह्यात हाच प्रकार सुरू आहे. नवीन आदेशानुसार आता तांत्रिक लेखापरीक्षणाची जबाबदारी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाकडे सोपविण्यात आली. चंद्रपूर अभियांत्रिकी महाविद्यालय व ब्रह्मपुरीतील शासकीय तंत्रनिकेतनला लेखापरीक्षणाची संधी मिळाली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांंच्या क्षेत्रात कोट्यवधींची पायाभूत कामे होतात. यामध्ये इमारतींपासून पायाभूत सुविधांचा समावेश असतो, परंतु कामांचा दर्जा अपेक्षित मानकाप्रमाणे नसतो. नागरिकांनी तक्रारी करूनही चौकशी करून कारवाई होत नाही. तक्रारी झाल्याच तर राजकीय नेत्यांच्या दबावामुळे या प्रकरणांची केवळ थातुरमातुर चौकशी होते. चंद्रपूर जिल्ह्यातही मनपा व काही नगरपरिषद व नगरपंचायतींच्या कामांबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. यावर पर्याय म्हणून आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासकामांचा तांत्रिक दर्जा कसा आहे, हे तपासण्याची जबाबदारी त्रयस्थ यंत्रणेकडे सोपविण्याचा निर्णय नगरविकास विभागाने १३ सप्टेंबर २०२१ रोजी जारी केला. तांत्रिक लेखापरीक्षण प्रभावी व परिणामकारक व्हावे, यासाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाची यादी जाहीर केली. त्यामध्ये चंद्रपुरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व ब्रह्मपुरी येथील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाचा समावेश आहे. या संस्थांना कोणत्या जिल्ह्यांची जबाबदारी दिली जाते, हे राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने अद्याप स्पष्ट केले नाही.

बाॅक्स

त्रयस्थ लेखापरीक्षणाचा फायदा काय?

स्थानिक स्वराज्य संस्थाबाहेरील त्रयस्थ संस्थेने केलेले लेखापरीक्षण पक्षपात झाला नाही हे दाखविण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. बाह्य लेखापरीक्षण अधिक चांगले व सुज्ञ निर्णय घेण्यास मदतकारक ठरू शकते. स्वराज्य संस्थेने दिलेल्या सूचनांपेक्षा भिन्न मानकांच्या संचाचे तपासणीसाठी अनुसरण करू शकते. अंतर्गत व बाह्य ऑडिटमधील विशेष फरक म्हणजे बाह्य ऑडिटरला पारदर्शकतेसाठी अधिक स्वातंत्र्य असते.

बाॅक्स

अंतर्गत लेखापरीक्षकांवर सत्ताधाऱ्यांचा वरचष्मा

जेव्हा ऑडिट त्रयस्थ संस्थेकडून केले जाते, तेव्हा त्यांनी व्यक्त केलेले अभिप्राय व शेरे हे अधिक निष्पक्ष व प्रामाणिक असू शकतात. कारणे देताना नाते बिघडण्याचा अथवा नोकरीवर परिणाम होण्याची भीती नसते. अंतर्गत लेखापरीक्षकांवर मात्र सत्ताधाऱ्यांचा वरचष्मा असतो.