शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यतेलासाठी शिक्षकांना करावी लागणार दारोदारी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2022 05:00 IST

पुरवठादाराकडून धान्यादी व तांदळाचा पुरवठा होण्यास विलंब झाल्यास शाळेत उपलब्ध असणारा तांदूळ, डाळ व कडधान्याचा उपयोग करून शाळास्तरावर मुलांना खिचडी किंवा भात, उसळ देता येईल, असेही पत्रात म्हटले आहे. मात्र,  शाळांमध्ये धान्य नसल्याने ते कसे देणार, हा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. त्यामुळे अग्रिम अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पोषण आहारची गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात येणार असल्याचे शिक्षकांचा ताण वाढला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विद्यार्थ्यांना १५ मार्चपासून  शिजविलेले अन्न पाककृतीनुसार द्यावयाची आहे.  यासाठी लागणारे तांदूळ, धान्यादी व इतर आवश्यक साहित्य पुरवठादार शाळेच्या स्तरावर करणार आहे. मात्र, त्याकरिता लागणारे खाद्यतेल सोयाबीन हे शाळांनी खरेदी करावे, इंधन व पालेभाज्यांवरील खर्च करणाऱ्या यंत्रणेकडून किंवा नेमलेल्या बचत गटाकडून करावयाचे आहे. सद्य:स्थितीत तेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यातच शाळांमध्ये शून्य बॅलन्स असल्याने शासनाने अग्रिम अनुदान द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष प्रकाश चुनारकर यांनी केली आहे. यासंदर्भात शासनाला निवेदनही पाठविले आहे.शिक्षण विभागाने पुरवठादारासोबत केलेल्या करारनाम्यामध्ये सोयाबीन खाद्यतेलाचा समावेश करण्यात आला नाही, असे शिक्षण संचालकांच्या पत्रात म्हटले आहे. पुरवठादाराकडून धान्यादी व तांदळाचा पुरवठा होण्यास विलंब झाल्यास शाळेत उपलब्ध असणारा तांदूळ, डाळ व कडधान्याचा उपयोग करून शाळास्तरावर मुलांना खिचडी किंवा भात, उसळ देता येईल, असेही पत्रात म्हटले आहे. मात्र,  शाळांमध्ये धान्य नसल्याने ते कसे देणार, हा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. त्यामुळे अग्रिम अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पोषण आहारची गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात येणार असल्याचे शिक्षकांचा ताण वाढला आहे.

अधिकचा ताण यापूर्वी इंधन व भाजीपाला खर्च शालेय पोषण आहार यंत्रणेद्वारे प्रथम केला जात होता. त्यानंतर  खर्च केलेली रक्कम दोन, तीन महिन्यांनंतर प्राप्त होत होती. आता यावेळी इंधन व भाजीपाल्यासोबतच खाद्यतेलाचा खर्च करणे आवश्यक झाल्याने शालेय पोषण आहार यंत्रणेला अधिकचा ताण सहन करावा लागणार आहे.

धान्य पोहोचलेच नाही- १५ मार्चपासून शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिजवलेला पोषण आहार  द्यायचा आहे. मात्र, जिल्ह्यातील शाळांमध्ये अद्यापही धान्यच पोहोचले नाही. त्यामुळे पोषण आहार देताना शिक्षकांची धावपळ होत आहे. दुसरीकडे शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकाऱ्यांना  पोषण आहार दिला की नाही, याची चौकशी करण्याचेही आदेश दिले आहे. त्यामुळे इकडे आड-तिकडे विहीर, अशी अवस्था शिक्षकांची झाली आहे.

 

टॅग्स :Schoolशाळा