शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

शिक्षकांच्या बदल्यांवर कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 19:24 IST

जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदलीमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात शासनाने अभ्यासगटाची नियुक्ती केली होेती. दरम्यान, एक महिन्यापूर्वीच या अभ्यास गटाने शासनाकडे अहवाल सादर केला. त्यामुळे शिक्षकांच्या आशा पल्लवीत झाल्या असतानाच कोरोनाच्या सावटामुळे शासन शिक्षकांच्या बदल्यासंदर्भात कार्य निर्णय घेते याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देअभ्यासगटाने सादर केला एक महिन्यापूर्वीच शासनाकडे आपला अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदलीमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात शासनाने अभ्यासगटाची नियुक्ती केली होेती. दरम्यान, एक महिन्यापूर्वीच या अभ्यास गटाने शासनाकडे अहवाल सादर केला. त्यामुळे शिक्षकांच्या आशा पल्लवीत झाल्या असतानाच कोरोनाच्या सावटामुळे शासन शिक्षकांच्या बदल्यासंदर्भात कार्य निर्णय घेते याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीसंदर्भात दरवर्षी मोठा गोंधळ होतो. या बदल्यांमध्ये एकसुत्रता यावी, कोणत्याही शिक्षकांवर अन्याय होऊ नये यासाठी काही वर्षांपूर्वी शिक्षकांची बदली ऑनलाईन करण्याचे धोरण शासनाने अवलंबिले होते. या धोरणानुसार शिक्षकांच्या बदल्या केल्या जात होत्या. ऑनलाईन बदलीमुळे शिक्षक संघटनांचे पदाधिकारी तसेच राजकीय हस्तक्षेपावरही काही प्रमाणात हा होईना, आळा बसला. मात्र या धोरणामध्येही काही त्रुटी असल्याचे नव्या सरकारच्या लक्षात येताच या बदल्यांमध्ये अधिकाधिक पारदर्शकता यावी यासाठी राज्यस्तरीय शिक्षण बदली धोरण ठरविण्यासाठी एका अभ्यासगटाची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये अध्यक्ष म्हणून पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद,सचिवपदी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, सदस्य म्हणून नंदूरबार जिल्हा परिषदेचे सीईओ विनय गौडा, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे सीईओ राहूल कर्डिले, उस्मानाबाद जिल्हा परिषदचे सीईओ डॉ. संजय कोलते यांचा समावेश होता. या अभ्यासगटाने आपल्या निर्धारित वेळेत शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, अप्पर मुख्य सचिव अरविंद कुमार यांच्याकडे अहवाल सादर केला. हा अहवाल सादर केल्यानंतर शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण असतानाच देशात आलेल्या कोरोनाच्या थैमानामुळे शासकीय स्तरावर हा अहवाल आता मागे पडला असून सर्व प्रशासकीय यंत्रणा या कामामध्ये गुंतली आहे. त्यामुळे यावर्षी शिक्षकांची बदली होण्याची शक्यता आतातरी मावळली आहे.शासननिर्णयाप्रमाणे शिक्षक पती-पत्नींना एकत्रिक बदली करून एकत्र आणण्यात आले होते. मात्र मागील वर्षी यातील काही बदलीपात्र झाल्याने दुसरीकडे बदली करण्यात आली. त्यामुळे पुन्हा पती-पत्नी दुरावले. विशेष म्हणजे, पती-पत्नी यापैकी दोघांच्या शाळेचे अंतर ३० कि..मी. पेक्षा अधिक नसावे, असा नियम असतानाही मागील वर्षी दूरवर बदली झाल्याने शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे नव्या अहवालानुसार यावर्षी बदली होऊन किमान आपण एकत्र येऊ, अशी अपेक्षा या शिक्षकांना होती. मात्र कोरोनामुळे ती यावर्षी तरी पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसTeacherशिक्षक