शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांत कमी उंचीच्या ताराबाई महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघातून सातव्यांदा निवडणूक रिंगणात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 11:42 IST

ताराबाईंनी आतापर्यंत सात वेळा निवडणूक लढविली असून, त्यांना १९९४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सहा हजार मते मिळाली होती.

प्रवीण खीरटकर, लोकमत न्यूज नेटवर्क, वरोरा (चंद्रपूर) : जनतेचे प्रश्न निकाली लागावे, समाजातील शेतकरी, महिला आणि गरजूंना न्याय मिळावा, याकरिता शेतकरी कुटुंबातील तारा महादेव काळे या ६१ वर्षीय महिला वरोरा विधानसभा क्षेत्रात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. जेमतेम ३ फूट ४ इंच उंची असलेल्या ताराबाई या राज्यात सर्वांत कमी उंचीच्या उमेदवार असाव्यात.ताराबाईंनी अपक्ष उमेदवार म्हणून आपली उमेदवारी दाखल केली. निवडून आल्यास गरिबांकरिता असलेल्या विविध योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचविणार, आयुष्मान भारत, आरोग्य विमा, पीक विमा, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध योजना या अजूनही जनतेपर्यंत पोहोचल्या नाहीत. त्या आजही फक्त कागदावरच आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे.

१९९४ मध्ये मिळाली होती सहा हजार मतेताराबाईंनी आतापर्यंत सात वेळा निवडणूक लढविली असून, त्यांना १९९४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सहा हजार मते मिळाली होती.

असा आहे वचननामा शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. वरोरा आणि भद्रावती या दोन्ही तालुक्यांत बेरोजगारांची मोठी फौज आहे.  त्यांच्या हाताला काम मिळवून देणे, हे आपले प्राधान्य असेल, असेही त्यांचे म्हणणे आहे.महिलांवरील अत्याचार, पिळवणूक आणि मालमत्ता बळकाविणे या गोष्टींवर आळा घालण्याकरिता मी प्रयत्न करेल आणि शेवटपर्यंत त्यांच्या हितासाठी लढेन, असे त्यांनी आपल्या वचननाम्यात स्पष्ट केले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४chandrapur-acचंद्रपूरElectionनिवडणूक 2024