शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी?; 'वर्षा'वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा
2
डॉ. मुजम्मिलच्या डायरीतून समोर आलं मोठं गुपित, 'कोड वर्ड'मध्ये लिहिला होता दहशतीचा प्लॅन! आणखी 25 नावं समोर
3
पार्थ पवारांच्या कंपनीला सूट द्यायची आहे का? बावनकुळेंच्या प्रश्नामुळे मुद्रांक शुल्क विभागच संभ्रमात
4
CM देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर येणार; दोघांची भेट लक्षवेधी ठरणार
5
तहसीलदार पदावरून ४ वेळा निलंबन; ‘कामाची’ सवय असलेले सूर्यकांत येवले लाच प्रकरणांतही आघाडीवर
6
दिल्लीत स्फोटापूर्वी मशिदीत गेला होता दहशतवादी डॉ. उमर नबी; स्फोटाच्या आधीचे सीसीटीव्ही समोर
7
अल-कायदाचा माजी कमांडर; व्हाईट हाऊसमध्ये अल-शरा आणि डोनाल्ड ट्रम्प यांची ऐतिहासिक भेट
8
“बूट फेकीसारख्या घटना पुन्हा घडू नये यासाठी काय उपाय करता येईल?”; सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
कर्तव्यनिष्ठेला सलाम! कुशीत बाळ अन् हातात मशीन... आई करतेय कंडक्टरचं काम; 'ती'चा संघर्ष
10
'या' सरकारी बँकेचा ग्राहकांना मोठा दिलासा; घर घेण्याच्या विचारात असाल तर, पाहा काय आहेत नवे दर?
11
Delhi Blast : व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल! दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी एका डॉक्टरला घेतलं ताब्यात
12
PAK vs SL: पाकिस्तानात स्फोट, श्रीलंकन क्रिकेटर मायदेशी परतण्याची भीती, PCBचा मोठा निर्णय
13
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटातील कारची ११ वर्षात ५ वेळा विक्री; खरा मालक कोण, शेवटचा व्यवहार कधी झाला?
14
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
15
Children's Day 2025: सुकन्या समृद्धी ते म्युच्युअल फंड SIP पर्यंत; बालदिनी तुमच्या मुलांना द्या खास आर्थिक गिफ्ट, जाणून घ्या स्कीम्स
16
बॉलिवूडच्या 'भट' कुटुंबात कटुता!, आलियाने सख्ख्या काकाला बोलवलं नाही लग्नाला अन् राहालाही नाही भेटवलं, मुकेश भट यांचा खुलासा
17
अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया
18
'अमेरिकन कामगारांना ट्रेन करा आणि घरी जा...' ट्रम्प प्रशासनाचं नवीन फर्मान; भारतीय IT अभियंते चिंतेत
19
"हिंदीतील लॉबीने मला स्वीकारलं नाही...", अजिंक्य देव स्पष्टच बोलले; अजय-सनीचं घेतलं नाव
20
डरानेवालो को डराओ! 'शिवतीर्थ'समोर बॅनरबाजी; उत्तर भारतीय सेनेने मनसे प्रमुख राज ठाकरेंना डिवचलं

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राजुऱ्यात टँकरने पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:26 IST

सध्या वर्धा नदीचे पात्र कोरडे पडल्याने राजुरा शहराला होणारा पाणीपुरवठा मागील आठवड्यापासून ठप्प आहे. नदी पात्रात पाणी वळविण्यासाठी नगर परिषदेने जेसीबी लावून युद्धपातळीवर काम सुरू केले आहे.

ठळक मुद्देआमदारांचा पुढाकार : वर्धा नदी आटल्याने शहरावर जलसंकट

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : सध्या वर्धा नदीचे पात्र कोरडे पडल्याने राजुरा शहराला होणारा पाणीपुरवठा मागील आठवड्यापासून ठप्प आहे. नदी पात्रात पाणी वळविण्यासाठी नगर परिषदेने जेसीबी लावून युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. तसेच पर्यायी स्त्रोतांद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, अनेक वॉर्डात पाणी समस्या गंभीर असल्यामुळे आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांच्या पुढाकारातून नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.शहरात तीव्र पाणी टंचाईची समस्या यावर्षी प्रथमच निर्माण झाली. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नियोजन नसल्यामुळे नगर पालिका प्रशासनाचा गोंधळ उडाला. सोमनाथपूर वॉर्डात नगरसेवक राजू डोहे यांनी स्वखर्चातून टँकरने पाणीपुरवठा सुरू केला. त्यानंतर आमदार अ‍ॅड. धोटे यांनी स्वत: पुढाकार घेत अनेक वॉर्डात टँकरने पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था केली आहे. यासाठी आपल्या कार्यालयाच्या संपर्क क्रमांकावर नागरिकांना फोन करून पाण्याची मागणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.सकाळी आणि सायंकाळी गरजेप्रमाणे वॉर्डात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे नगर प्रशासनावरील ताण थोडा कमी झाला आहे. मात्र वर्धा नदीच्या पात्रातील पाणी कालगाव येथील इनटेक विहिरीकडे वळविण्यासाठी नगराध्यक्ष अरूण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे यांचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत.नदीच्या पात्रात पाण्याची पातळी खाली गेल्याने पाणी मुबलक मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे पर्यायी स्त्रोतांवर नागरिकांना पाणीपुरवठा करणे गरजेचे झाले आहे. या क्षेत्रात असलेल्या कोळसा व सिमेंट उद्योगांतर्गत मोठ्या प्रमाणात पाणी लागते. वर्धा नदीतून पाणी घेतले जाते. या नदीचा प्रवाह कायमम ठेवण्यासाठी किंवा पाणी उपलब्ध राहील अशी व्यवस्था करण्यासाठी बॅरेज बंधारा बांधण्याची मागणी मागील दहा वर्षांपासून सातत्याने होत आहे. मात्र, शासनाने कधीच लक्ष दिले नाही. त्यामुळे शहरावर पाण्याचे संकट निर्माण झाले आहे.उद्योगाच्या माध्यमातून शासनाला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळते. मात्र, हा निधी इतरत्र वळवून येथील विकास कामांकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी येथील नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई