शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी पुढाकार घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 05:01 IST

विद्यार्थ्यांचा बौद्धिक सामाजिक व भावनिक विकासावरही परिणाम होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची काळजी घेण्याचे आवाहन करून गावातील उपलब्ध साधनांद्वारे गरजु विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे भावनिक आवाहन जिल्हा परिषद सीईओ राहूल कर्डिले यांनी जिल्ह्यातील सरपंचाना केले आहे. यासंदर्भात त्यांनी प्रत्येक सरपंचाना भावनिक पत्र पाठविले आहे.

ठळक मुद्देसीईओंचे सरपंचांना भावनिक पत्र : सुविधांपासून वंचित असलेल्या मुलांच्या पाठीमागे उभे रहा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात विपरीत परिस्थिती निर्माण झाली आहे. यातून प्रत्येक जण वेगळा अनुभव घेत आहे. अशावेळी विद्यार्थ्यांचेही मोठे नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांचा बौद्धिक सामाजिक व भावनिक विकासावरही परिणाम होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची काळजी घेण्याचे आवाहन करून गावातील उपलब्ध साधनांद्वारे गरजु विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे भावनिक आवाहन जिल्हा परिषद सीईओ राहूल कर्डिले यांनी जिल्ह्यातील सरपंचाना केले आहे. यासंदर्भात त्यांनी प्रत्येक सरपंचाना भावनिक पत्र पाठविले आहे.शाळा सुरु नसल्या तरी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शासनस्तरावरून विविध उपाययोजना केल्या जात आहे. मुलांपर्यंत ऑनलाईन माध्यमाद्वारे अभ्यासक्रम पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत मुले शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर राहणार नाही. यासाठी शासनाने सुरु केलेले उपक्रम जिल्ह्यातील मुलांपर्यंत प्रभावीपणे पोहचविण्याची आपण सर्वांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.विशेष म्हणजे, काही पालकांकडे टीव्ही, रेडिओ, स्मार्ट फोन नाही. अशावेळी विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी समाज मंदिर, विहारामध्ये असलेल्या लाऊडस्पीकचाही वापर करता येईल, एवढेच नाही तर ग्रामपंचायत कार्यालय, समाजभवन येथील टीव्ही, रेडिओ या सुविधांचाही विद्यार्थ्यांसाठी उपयोग करून विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहचवण्याचे आव्हान आपण सहज पेलू शकणार आहे. यातून ऑनलाईन शिक्षणाचे द्वार सुरु करावे, असेही त्यांनी सरपंचांना पाठविलेल्या पत्रामध्ये नमूद केले आहे.गावातील भिंती बोलक्या कराप्राथमिक स्तरावरील शाळा अद्यापही सुुरू झाल्या नाही. त्यामुळे अभ्यासापासून मुले दूर जात आहे. त्यांच्या डोळ्यासमोर सतत शिक्षणाविषयी जनजागृती व्हावी, त्यांच्यामध्ये मागील शैक्षणिक सत्रातील तसेच चालू सत्रातील अभ्यासक्रम उभा रहावा यासाठी गावातील सार्वजनिक भिंतींवर शैक्षणिक माहिती, गणितीय सुत्रे रंगविण्याच्या सुचनाही करण्यात आल्या आहे. या माध्यमाधातून जरी विद्यार्थी शाळेत गेले नसले तरी त्यांच्या समोर सतत अभ्यासाविषयी आवड निर्माण होतील, असेही नमूद करण्यात आले आहे.या निधीतून करता येईल शाळांची स्वच्छताकोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही शाळा बाहेरील नागरिकांना राहण्यासाठी खुल्या करण्यात आल्या होत्या. आजही काही शाळांमध्ये क्वारंटाईन केल्या जात आहे. त्यामुळे शाळांच्या स्वच्छतेचा मोठा प्रश्न ग्रामपंचायत प्रशासनासमोर उभा आहे. यासाठी सीईओंनी उपाय सांगितला असून १४ आणि १५ व्या वित्त आयोग तसेच ग्रामपंचायतस्तरावरील उपलब्ध निधीतून शाळांची स्वच्छता करून द्यावी, असेही सरपंचांना त्यांनी पत्रातून सांगितले आहे.तरुणांना स्वयंसेवक म्हणून घोषित करावेगावातील विद्यार्थी कोणत्याही परिस्थितीत शिक्षणामध्ये मागे पडू नये, यासाठी गावातील शिक्षित तरुणांना स्वंयसेवक म्हणून घोषित करावे. त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू ठेवता येईल.प्रभावी शिक्षण हेच व्यक्तीमत्व विकासाचे अभीन्न अंग आहे. याद्वारेच देशाचे उज्ज्वल भविष्य घडविणारी पिढी निर्माण होणार आहे. यामध्ये आपला हातभार लागणे ही सुद्धा आपल्यासाठी अभिमानाचीच बाब आहे.असेही पत्राच्या शेवटी नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद