सवलत मिळणार : सुभाष धोटे यांचे आवाहनराजुरा : कृषी ग्राहकावरील वीज बिलाच्या थकीत रकमेचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने कृषी संजीवनी योजना २०१४ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी चालु कृषी ग्राहकांना त्यांच्या ३१ आॅगस्टपर्यंतच्या मूळ रकमेची ५० टक्के रक्कम एकरकमी किंवा तीन मासिक हफ्त्यात भरली तर, उरलेली ५० टक्के मुळ थकित रक्कम महाराष्ट्र शासनातर्फे महावितरणाला रोखीने व समप्रमाणात अनुदान स्वरूपात अदा करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये भाग घेणाऱ्या कृषि ग्राहकांचे ३१ मार्च २०१४ पर्यंत थकित असलेले पूर्ण व्याज व दंड हे वितरण कंपनीतर्फे माफ करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याची विनंती आमदार सुभाष धोटे यांनी केली आहे.या योजनेअंतर्गत कृषी ग्राहकांना ५० टक्के मुळ थकबाकीची रक्कम तीन हफ्त्यात भरावयाची आहे. यात कमीत कमी २० टक्के ३१ आॅगस्टपर्यंत, २० टक्के रक्कम ३० सप्टेंबरपर्यंत व उरलेली १० टक्के रक्कम ३१ आॅक्टोबरपर्यंत भरावयाची आहे किंवा ५० टक्के मुळ थकबाकी एकरकमी ३१ आॅगस्ट २०१४ पूर्वी भरता येवू शकते. या योजनेचा लाभ घेण्याची विनंती आमदार सुभाष धोटे यांनी केली आहे. योजनेत सहभागी कृषी ग्राहकांना १ एप्रिल २०१४ नंतरची सर्व चालू वीज बिले नियमित भरणा करणे आवश्यक आहे. ३१ मार्चपर्यंत जे ग्राहक थकबाकीदार नाहीत अशा ग्राहकांची पुढील दोन त्रिमासिक बिलाची ५० टक्के रक्कम माफ करण्यात येतील व माफ केलेली रक्कम शासनाकडून महावितरणला अनुदान रूपात अदा होणार आहे.ज्या कृषी ग्राहकाने योजनेत सहभाग घेतला नाही, योजनेअंतर्गत ठरविण्यात आलेल्या रक्कमेचा भरणा केला नाही अशा कृषी ग्राहकांना योजनेकरिता अपात्र ठरविण्यात येणार आहे. व्याज व दंडासहित पूर्ण रक्कम पूनश्च ग्राहकाच्या खात्यात दर्शविल्या जाणारा आहे. विद्युत कायदा २००३ नुसार थकबाकी वसुलीकरिता कार्यवाही होणार आहे. सदर योजना शेतकऱ्यावरील थकबाकीचा बोजा कमी करण्यासाठी आहे. शासनाच्या या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनी घेण्याची विनंती आमदार सुभाष धोटे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
शासनाच्या कृषी संजीवनी योजनेचा लाभ घ्यावा
By admin | Updated: July 28, 2014 23:28 IST