शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाचा संशयास्पद मृत्यू; मृतदेह घेण्यास कुटुंबियांचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 13:53 IST

टेकामांडवा पोलिस हद्दीतील गोलेरवारगुडा येथील घटना

जिवती (चंद्रपूर) : तालुक्यातील टेकामांडवा हद्दीतील गोलेवारगुडा येथील एका २४ वर्षीय तरुणाचा शेतातील कडूलिंबाच्या झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह आढळला. ही घटना गुरुवारी उघडकीस आली. मात्र, तरुणाची हत्या करण्यात आल्याचा आरोप कुटुंबियांनी करत शवविच्छेदनानंतर मृतदेह दोन तासांपासून चौकात ठेवत सखोल चौकशी करून आरोपीला ताब्यात घेण्याची मागणी केली आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.

संतोष राजेंद्र शिंदे (२४, रा. गोलेवारगुडा) असे मृत तरुणाचे नाव आहे. संतोष २८ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजताचे दरम्यान बाहेर जाऊन येतो, असे आपल्या आईला सांगून स्प्लेंडर दुचाकी घेऊन बाहेर पडला. उशिरापर्यंत आपला मुलगा घरी आला नाही म्हणून त्याच्या आई-वडिलांनी ठिकठिकाणी फोन करून विचारणा केली. २९ मार्चलाही तो कुठेच सापडला नाही. मात्र, ३० मार्च रोजी संतोषचा मृतदेह शेतातील झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत आढळला.

शवविच्छेदन करून आणलेला मृतदेह गाडीतच नातेवाईकांनी दोन तासांपासून चौकात ठेवला. ही हत्या असल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात असून, जोपर्यंत आरोपीला ताब्यात घेण्यात येणार नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. रात्री उशिरापर्यंत पोलिस कार्यवाही सुरू होती. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक रवींद्र म्हैसकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार एस. पी. मडावी पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchandrapur-acचंद्रपूर