शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीच्या घरी प्रियकराचा संशयास्पद मृत्यू  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 04:31 IST

प्रियकराचा प्रेयसीच्याच घरी गळफास लावलेल्या अवस्थेत रविवारी सकाळी मृतदेह आढळला. मात्र यात घातपात झाल्याचा आरोप प्रियकराच्या वडिलांनी केला आहे. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकाºयांचे वाहन रोखून जोपर्यंत तक्रार घेऊन गुन्हा दाखल करणार नाही...

बाखर्डी (चंद्रपूर) : प्रियकराचा प्रेयसीच्याच घरी गळफास लावलेल्या अवस्थेत रविवारी सकाळी मृतदेह आढळला. मात्र यात घातपात झाल्याचा आरोप प्रियकराच्या वडिलांनी केला आहे. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकाºयांचे वाहन रोखून जोपर्यंत तक्रार घेऊन गुन्हा दाखल करणार नाही, तोपर्यंत शवविच्छेदन करू देणार नाही, अशी भूमिका मृताच्या नातेवाइकांनी घेतली आहे. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.पुल्लया देवराव परचाके असे मृताचे नाव आहे. तो कोरपना तालुक्यातील कवठाळा ग्रामपंचायतीत संगणक परिचालक म्हणून काम करत होता. रविवारी सकाळी ७ वाजता पोलिओ लसीकरण असल्याने पुल्लया परचाके यांनी पोस्टर लावले. नंतर तो त्याच कवठाळा येथील आपल्या प्रेयसीच्या घरी गेला. सकाळी मुलीचे आई-वडील शेतात गेले होते. दरम्यान, पुल्लयाचे आपल्या प्रेयसीसोबत काही कारणास्तव भांडण झाले. त्यामुळे ती तेथून पळाली व आपल्या चुलत भावाच्या घरी गेली. यावेळी पुल्लया प्रेयसीच्याच घरी होता. मुलीचा भाऊ तिथे पोहोचला असता त्याला ओढणीने गळफास लावलेल्या स्थितीत पुल्लयाचा मृतदेह आढळून आला. तो जिवंत असेल, असे समजून मुलीच्या भावाने त्याला फासातून बाहेर काढले आणि डॉक्टरांना माहिती दिली. मात्र डॉक्टरांनी पुल्लयाला मृत घोषित केले.

टॅग्स :Deathमृत्यू