शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
2
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
3
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
4
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
6
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
7
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
8
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
9
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
10
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
11
TET Paper Leak: मराठवाड्यातून गोंदियातील शिक्षकांना कॉल, कुणाकडे दीड लाख, कुणाला मागितले तीन लाख रुपये
12
'सहकुटुंब सहपरिवार' फेम अभिनेत्री अडकली लग्नबेडीत, पुण्यात थाटामाटात पार पडला विवाहसोहळा
13
चीनने पुन्हा गरळ ओकली; अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा पुनरुच्चार...
14
Travel : परदेशात कशाला... भारतातच आहे 'मिनी थायलंड'; कपल्ससाठी 'स्वर्गीय' ठिकाण!
15
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
16
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
17
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
18
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
19
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
20
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलित कामगारांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 23:51 IST

उत्पादनाचे लक्ष्य गाठण्यासाठी कामगारांचा जीव धोक्यात घालून वेकोलि प्रशासनाने माजरी क्षेत्रातील विविध खाणींत उत्खननाचे काम करीत आहेत.

ठळक मुद्देजादा उत्पादनाचा हव्यास : सहा दिवसांतच घडली दुसरी घटना

विनायक येसेकर ।आॅनलाईन लोकमतभद्रावती : उत्पादनाचे लक्ष्य गाठण्यासाठी कामगारांचा जीव धोक्यात घालून वेकोलि प्रशासनाने माजरी क्षेत्रातील विविध खाणींत उत्खननाचे काम करीत आहेत. याच उत्पादन हव्यासापोठी तेलवासा खाणीत ढिगारा कोसळल्याने कामगाराचा मृत्यू झाला. तर अवघ्या सहा दिवसांत नवीन कुनाडा येथील खाणीतील दरड कोसळून सहा कामगार जखमी झाल्याने विविध कामगार संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.माजरी वेकोलि क्षेत्रातील तेलवासा, चारगाव, ढोरवासा आणि कुनाडा या कोळसा खाणी उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जातात. परंतु, येथील कोळश्याचे उत्पादन काही प्रमाणात ठप्प झाल्याने कामगारांना कामासाठी अन्य खाणीत हलविण्यात आले आहे. तेलवासा व ढोरवासा येथील खाण मोजक्याच कामगारांचा भरोशावर सुरू आहेत. तर चारगाव व कुन्हाडा येथे शंखमुगन कोल कॅरिअर कंपणी व धनसार इंजिनिअरींग या दोन खासगी कंपन्यांकडून माती व कोळसा काढण्याचे काम सुरु आहे. या कंपन्यांवरच वेकोलि प्रशासनाची मदार आहे. वेकोलिच्या तेलवासा येथील खुल्या कोळसा खाणीत २०१७ या एका वर्षात पाच लाख टन कोळसा काढण्याचे उद्दिष्ठ होते. मात्र, प्रत्यक्षात १ लाख टन कोळसा उत्पादन काढण्यात आले. वेकोलिने उत्पादनाच्या हव्यासापोटी या दोन महिन्यात कामगारांना जणू जनावरांप्रमाणे जुंपले होते. कोळसा उत्पादन सुरू असताना तेलवासा क्षेत्राच्या क्षेत्र व्यवस्थापकांना या खाणीतील ब्लॉस्टिंगमुळे बेंचला तडा गेल्याची माहिती होती. तरी सुद्धा वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे दुर्लक्ष केल्याने २४ नोव्हेंबरला ढिगारा कोसळून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. उत्पादन वाढविण्यासाठी हाच पायंडा धनसार इंजिनिअरिंग कंपनीने सुरू ठेवला असून, त्याचे दुष्परिणाम कामगारांच्या अपघातात होत असल्याचे दिसून येत आहे. कुनाडा येथील खुल्या कोळसा खाणीत कंपनीचे ४७५ कामगार कार्यरत आहेत. या खाणीचे दोन वर्षांपासून माती व कोळसा उत्खनन सुरू असून या वर्षी १२ लाख टन कोळसा उत्खनन करण्याचे लक्ष्य देण्यात आले. मात्र, मुदत संपत असल्याचे पाहून कंपनीच्या अधिकाऱ्यांनी रात्रंदिवस उत्खनन चालू ठेवले. परिणामी, आतापर्यंत आठ लाख टन कोळसा बाहेर काढण्यात आल्याचे समजते.वर्षाअखेर चार लाख टन कोळसा काढण्याच्या नादात ३० नोव्हेंबरला ढिगारा कोसळून सहा कामगार जखमी झाले होते. मात्र ही घटना घडण्यापूर्वी वेकोलि प्रशासन तसेच धनसार कंपनीच्या अधिकाऱ्यांना कोळसा बेंचमधील मोठ्या भागाला तडा गेल्याचे तेथीलच एका अधिकाऱ्याने कल्पना दिली होती. पण, उत्पादनाचे लक्ष्यांक पूर्ण करण्यासाठी कामगार तसेच खाणीत सुरक्षेची साधने न वापरता कंपनीने उत्खनन चालू ठेवल्याने हा अनर्थ घडल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या परिसरातील शंखमुगन कोल कॅरिअर व धनसार इंजिनिअरिंग या दोन्ही कंपन्या माती तसेच कोळशाचे उत्खनन करतात. रात्रंदिवस काम करत आहेत. आठ तासांचा कामाचा कालावधी असताना त्यांच्याकडून बारा ते चौदा तास कामे करुन घेतली जात आहेत, तक्रारींची दखल घेण्यात आली नाही.कामगार कायदा धाब्यावरकोळसा उत्खनन करणाऱ्या खासगी कंपनीमध्ये स्थानिक कामगारांची संख्या अधिक आहे. मात्र, वेकोलिच्या नियमानुसार कामगारांना कोणत्या सुविधा दिल्या जात नाही. १० हजार ते १२ हजार रुपये मासिक वेतनावर हे कामगार काम करीत आहेत. याविरुद्ध अन्यायग्रस्त खासगी कामगारांनी वेकोलिचे क्षेत्रीय कार्मिक प्रबंधक आणि केंद्रीय श्रम आयुक्तांकडे तक्रार केली होती. परंतु या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. कामगार कायद्याचेही उल्लंघन होत आहे.