पेंढरी (कोके) : पारंपारिक पिकांना बगल देत चिमूर तालुक्यातील नेरी येथील शेतकरी संपदी वामनराव कामडी यांनी खांबाडा-नेरी मार्गावरील आपल्या दोन एकर शेतात सूर्यफूलाचे पीक लावले आहे. सूर्यफुलाचे पीक अतिशय डोलदार असून इतर शेतकऱ्यांनीही या पिकाच्या उत्पन्नाकडे वळावे, असे त्यांचे म्हणणे आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना तेच-ते पीक घेणे कठीण झाले आहे. सिंदेवाही- चिमूर तालुके हे धान व हळद या पारंपारिक पिकांसाठी प्रसिद्ध आहेत. या पिकासोबतच कडधान्याचे पीक सुद्धा घेतली जातात. ज्यांच्याकडे सिंचनाची बारमाही सोय आहे ते शेतकरी आता सूर्यफुलाचे नगदी पीक घेत आहेत. नेरी येथील शेतकरी संदीप कामडी यांना आपल्या दोन एकरात सूर्यफूलाचे पीक घेतले आहे. त्यांना दोन एकरासाठी दोन हजार रुपये खर्च आला व उत्पन्न २० हजार रुपये होण्याची आशा आहेत. या बहुपीक पद्धतीमुळे शेतकऱ्यांना चांगला आर्थिक लाभ होवू शकतो, अशी प्रतिक्रिया संदीप कामडी यांनी ‘लोकमत’ला दिली. (वार्ताहर)
खांबाडा-नेरी मार्गावर फुलली सूर्यफुलाची शेती
By admin | Updated: March 27, 2015 00:54 IST