मळणीनंतर बियाणे ताडपत्री, सिमेंटच्या खळ्यावर पातळ पसरून बियाणांतील आर्द्रतेचे प्रमाण १० ते १२ टक्क्यांपर्यंत आणावे. बियाणे स्वच्छ करून पोत्यात भरून साठवण करावी. साठवणीचे ठिकाण थंड, ओलावारहित व हवेशीर असले पाहिजे. साठवण करताना एकावर एक चारपेक्षा जास्त पोती ठेवू नये.
उत्पादन- उन्हाळी सोयाबीनचे एकरी ३ ते ५ क्विंटलपर्यंत सरासरी उत्पादन येऊ शकते.
उन्हाळी सोयाबीनचे उत्पादन खरीप हंगामासारखे होत नाही. दाण्याचा आकार लहान असतो. १०० दाण्याचे वजन ८ ते १० ग्रॅम असते. उन्हाळी सोयाबीनचा हंगाम फक्त घरच्या घरी बीजोत्पादन करण्यासाठी चांगला आहे. खरीप २०२० मध्ये सोयाबीन काढणीच्या वेळेस आलेल्या पावसामुळे सोयाबीनचे बियाणे मोठ्या प्रामाणात भिजलेले असल्यामुळे अशा बियाणांची उगवणक्षमता कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे, अशा शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन घ्यावे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी केले आहे.