शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्ती मिळूनही विद्यार्थ्यांनी केले शासन नियमांचे उल्लंघन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 15:09 IST

महाविद्यालयाची फी अडविली : 'सोमय्या'च्या प्राचार्यांचे पंतप्रधानांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांची महाविद्यालयाची ६० टक्के शुल्क शिष्यवृत्तीच्या स्वरूपात केंद्र शासनाने विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली आहे. मात्र, काही विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे शुल्क या शिष्यवृत्तीच्या रकमेतून अदा न करता महाविद्यालयाची फसवणूक केली आहे. विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाल्यानंतर ती सात दिवसांच्या आत महाविद्यालयाला देणे बंधनकारक आहे. असे असतानाही विद्यार्थ्यांनी यामध्ये हयगय केली आहे. त्यामुळे महाविद्यालयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

अशा विद्यार्थ्यांवर कारवाई करून महाविद्यालयाची फी वसूल करावी, या संदर्भातील पत्र येथील सोमय्या पॉलिटेक्निकच्या प्राचार्यांनी केंद्र, राज्य शासनासह, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकाऱ्यांना पाठविले आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांची सत्र २०२१-२२, २२-२३ आणि २०२३-२४ या पहिल्या हप्त्याची शिष्यवृत्तीची ४० टक्के रक्कम महाराष्ट्र शासनातर्फे संस्थेच्या बँक खात्यात जमा केली आहे. दुसऱ्या हप्त्याची ६० टक्के शिष्यवृत्ती ही विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात केंद्र शासनाच्या निर्णयानुसार केंद्र शासनाच्या एनएसपी स्कॉलरशिप पोर्टलवरून पीएफएमएस प्रणालीद्वारे जमा करण्यात आली आहे.

केंद्र शासनाच्या निर्णयानुसार महाविद्यालयाची ६० टक्के फी शिष्यवृत्तीच्या स्वरूपात केंद्र शासनाने विद्यार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात म्हणजे, यापूर्वी ज्या बँक खात्यात स्कॉलरशिप येत होती, त्या बँक खात्यात १ जानेवारी २०२५ रोजी जमा केली आहे. केंद्र आणि राज्य शासन यांच्या निर्णयानुसार महाविद्यालयाची स्कॉलरशिपच्या स्वरूपात आलेली रक्कम विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या बँकेच्या खात्यात सात दिवसांच्या आत जमा करणे बंधनकारक आहे. असे असतानाही अनेक विद्यार्थ्यांनी ती रक्कम महाविद्यालयाच्या खात्यात जमाच केलेली नाही. परिणामी, महाविद्यालयाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

२४ लाखांवर रक्कम अडकलीसन २०२१-२२ तसेच २३ या सत्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या १३ विद्यार्थ्यांनी ६० टक्केचे शिष्यवृत्तीची रक्कम ५ लाख ३४ हजार ६००, सत्र २०२३-२४ मधील ६० टक्के शिष्यवृत्ती ४ लाख ९५ हजार ४००, असे एकूण १० लाख ३० हजार रुपये विद्यार्थ्यांनी जमाच केले नाहीत. दरम्यान, बँकेचे स्टेटमेंट जोडलेल्या २०२१-२२ आणि २०२२-२३ या सत्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या १४ विद्यार्थ्यांचे एकूण ६ लाख ५१ हजार ४०० व सत्र २०२३-२४ या सत्रातील १७ विद्यार्थ्यांचे एकूण ८ लाख १७ हजार २०० रुपये, अशी एकूण १४ लाख ६८ हजार ६०० रुपयांची शिष्यवृत्ती अद्यापपर्यंत जमा करण्यात आली नसल्याचे प्राचार्यांनी पत्रात म्हटले आहे. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर