शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शाळेत विद्यार्थ्यांकडून करुन घेतले जाते भांडे साफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 15:18 IST

ना-सुविधा, ना सीसीटीव्ही कॅमेरे : पालकांनी व्यक्त केला रोष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्थानिक बाबूपेठ येथील मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांकडून चक्क भांडे साफ करून घेतले जात असल्याचा गंभीर आरोप मंगळवारी पालक-शिक्षक सभेत समोर आला. यासोबतच शाळेतील बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे बंद असतात, सुरू असल्यास शिक्षक बंद करुन ठेवत असतात. विद्यार्थ्यांना कोणत्याही सोई- सुविधा पुरविल्या जात नाहीत, अशा तक्रारी पालकांनी पालक सभेत केल्या. बाबूपेठ येथे मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी निवासी मूकबधिर आश्रमशाळा चालवली जाते. मात्र, मागील काही दिवसांपासून येथे विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. याबाबतच्या तक्रारीही जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे गेल्या होत्या. दरम्यान, या शाळेत ३० जुलै रोजी पालक- शिक्षक सभेचे आयोजन करण्यात आले होते.

सभेला मुख्याध्यापक चौधरी, भरोसा सेलच्या पोलिस उपनिरीक्षक अपेक्षा मेश्राम यांच्यासह शाळेतील शिक्षकांची उपस्थिती होती. पालक सभा सुरु होताच पालकांनी विद्यार्थ्यांना सोई-सुविधा पुरविण्यात येत नसल्याबद्दल रोष व्यक्त केला. तसेच शिक्षक मुलांची काळजी घेत नाहीत, वैद्यकीय मदत पुरवत नाहीत, मुलींना शाळेत प्रवेश देत नाहीत, पालकांना सहकार्य करत नाहीत, विचारपूस केल्यास उडवाउडवीची उत्तरे देतात. मुलांकडून भांडे साफ करून घेतात, शाळा जास्तीत जास्त बंदच असते, मुले-मुली शाळेत सुरक्षित नाहीत अशा तक्रारींचा पाढाच पालकांनी वाचला

विद्यार्थ्यांना 'गुड टच-बॅड टच'चे दिले धडेशिक्षक-पालक सभेचे औचित्य साधून भरोसा सेलच्या पोलिस उपनिरीक्षक अपेक्षा मेश्राम यांनी विद्यार्थ्यांशी ट्रान्स्लेटरच्या मदतीने संवाद साधत गुड टच- बॅड टच' तसेच पोक्सो कायदा, डायल ११२, वाहतुकीचे नियम, धूम्रपानाचे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन केले.

भरोसा सेलच्या पाहणीत काय आढळलेपालक-शिक्षक सभेत भरोसा सेलच्या पोलिस उपनिरीक्षक अपेक्षा मेश्राम यांची उपस्थिती होती. पालकांच्या तक्रारी ऐकताच त्यांनी स्वतः शाळेची व वसतिगृहाची तपासणी केली. यावेळी शाळेत सीसीटीव्ही नाही, जेथे आहेत ते कॅमेरे शिक्षक बंद ठेवतात, बहुतेक वेळा शाळा बंदच असते, मुलींची संख्या केवळ दोनच आहे. याबाबत पालकांना विचारणा केली असता, मुले-मुली शाळेत सुरक्षित नाहीत असे सांगितले. तर वसतिगृहाच पाहणी केली असता, वसतिगृहाच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरा नाही, सुरक्षा भित सुरक्षित नाही, स्वच्छतागृह सुरक्षित नाही. यासंदर्भातील अहवाल पीएसआय मेश्राम यांनी पोलिस अधीक्षकांना सादर केल्याची माहिती आहे. याबाबत त्यांना विचारणा केली असता, त्यांनी अधिकृत दुजोरा दिला आहे. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरSchoolशाळा