शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

...तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय; चक्क वस्त्र भंडारात जाऊन मालकाला गोंजारते गोमाता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 15:43 IST

चिमुरातील प्रेमाची सुखद घटना

राजकुमार चुनारकर

चिमूर (चंद्रपूर) : मुक्या जनावरांवर प्रेम केले तर तेदेखील माणसावर तितक्याच उत्कटतेने प्रेम करतात. ही भावना त्यांच्यात निसर्गत:च असते; परंतु काहीजण करंटे असतात. जनावरे मुकी म्हणून त्यांना चुकीची वागणूक देतात. प्रेमाने प्रेम वाढते. याचा नितांत सुंदर प्रत्यय चिमूर येथील पूजा वस्त्र भांडारातील एका घटनेने पुढे आला. तो प्रसंग अनुभवला की ‘हंबरून वासराले चाटती जवा गाय, तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय’ या कवितेच्या ओळी सहजपणे ओठावर येतात.

चिमूर शहरातील बाजार ओळीत पूजा वस्त्र भांडार नावाने ओमप्रकाश जाकोटीया (मामाजी) यांचे दुकान आहे. या दुकानात सायंकाळी एक गाय दरवाजातून सरळ दुकानात शिरते. एवढेच नाही तर चक्क काऊंटरवर जाऊन ओमप्रकाश जाकोटीया यांना जिभेने चाटून गोंजारते. दुकानमालक मामाजीसुद्धा तेवढ्याच आस्थेने तिला जवळ घेत प्रेम देतात. या गायींचा हा प्रयोग नित्याचाच आहे. मामाजी या गायीला गूळ आणून खायला देतात. गूळ खाऊन झाला की ती दुकानात ग्राहकांसाठी असलेल्या गादीवरच विराजमान होते. हा प्रसंग अनेकवेळा ग्राहकांना आश्चर्यकारक वाटतो. मात्र, या दुकानात ही गाय नित्यानेच येतात आणि तिचा दिनक्रमही ठरलेला आहे. या गायींचा लळा मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. विशेष म्हणजे, ही गाय ओमप्रकाश जाकोटीया यांच्या मालकीची नसून गावातील एका शेतकऱ्याची आहे.

मागील अनेक वर्षांपासून आपल्या दुकानात गाय येतात. या गायींना गूळ तसेच पाणी देऊन त्यांची तहान, भूक भागविली जाते. गोमातेचे प्रेम आपल्याला मिळत असून, यातून समाधान मिळते. यामुळे दुकानाला किंवा आम्हाला कोणताही त्रास नाही.

- ओमप्रकाश जाकोटीया, व्यावसायिक, चिमूर

टॅग्स :Socialसामाजिकchandrapur-acचंद्रपूर