शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अजबच! स्वयंपाकघर तेलंगणात तर बैठकखोली महाराष्ट्रात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2022 07:00 IST

Chandrapur News चंद्रपूर जिल्ह्यात एक असेही घर आहे, त्या घरातील स्वयंपाक घर तेलंगणात व बैठक खोली महाराष्ट्रात आहे. अशा या अनोख्या घराची सध्या चांगलीच चर्चा आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र-तेलंगणा वादात अडकलेल्या गावातील घराचीही केली विभागणी

दीपक साबने

चंद्रपूर: जिल्ह्यात एक असेही घर आहे, त्या घरातील स्वयंपाक घर तेलंगणात व बैठक खोली महाराष्ट्रात आहे. अशा या अनोख्या घराची सध्या चांगलीच चर्चा आहे. ऐकायला जरी नवल वाटत असेल तरी हे सत्य आहे. महाराष्ट्र तेलंगणा राज्याच्या सीमावादात अडकलेल्या एका गावातील या घराची विभागणी दोन्ही राज्यात झाली आहे. दहा खोल्यांचे हे घर अर्धे तेलंगणात आहे तर अर्धे महाराष्ट्रात आहे. सीमावादात अडकलेल्या १४ गावांपैकी महाराजगुडा या गावात पवार कुटुंबीय त्या घरात वास्तव्यास आहेत.

तेलंगणा सरकारने राज्याची सीमा निर्धारित केली. ही सीमा गावाच्या मध्यभागातून गेल्यामुळे अर्धे गाव तेलंगणा आणि अर्धे गाव महाराष्ट्र राज्यात आले आहे. दोन राज्यांच्या सीमावादात केवळ गावालाच विभागले नसून एका घरालाही विभागले आहे. पवार भावंडाचं घर विभागून चंदू देवसिंग पवार यांचे घर तेलंगणात तर उत्तम देवसिंग पवार यांचे महाराष्ट्रात आले आहे. विशेष म्हणजे, याच घरातील स्वयंपाक रूम तेलंगणात तर बैठक रूम महाराष्ट्रात आली आहे. या गावातील गणेश शत्रू जाधव यांच्या घराचा समोरचा भाग तेलंगणा आणि मागचा भाग महाराष्ट्रात आल्याचे गावकरी सांगतात. तेलंगणा सरकारने सीमा निश्चिती केली असली तरी यास मान्यता नाही.

सीमावादात अडकलेल्या १४ गावांपैकी महाराजगुडा हे एक गाव आहे. या गावावर तेलंगणा व महाराष्ट्र सरकार अधिकार सांगतात. या गावात दोन्ही राज्यांच्या अंगणवाडी, शाळा, ग्रामपंचायत आहेत व कल्याणकारी योजना पण राबवितात. एकाच ठिकाणचे नागरिक दोन राज्यात मतदान करतात. हे उदाहरण सीमावादात अडकलेल्या १४ गावात पाहायला मिळते.

तेलंगणा सरकारने दिले शेतीचे पट्टे

तेलंगणा सरकारकडून काही जणांना शेतीचे पट्टे देऊन त्यावर लाभ देणेही सुरू केले आहे. तसेच भरीव विकासकामे केल्याचेही गावकरी सांगतात व विविध योजनांचा लाभही नागरिक घेताना दिसून येतात. त्यामुळे गावातील काही जणांचा तेलंगणाकडे जाण्याचा कल आहे. मात्र जे सरकार शेतीचे पट्टे देतील तिथे राहू, असेही गावकरी सांगतात.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके