शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
2
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालालाचे गाणे ऐका, कळेल.."
3
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
4
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
5
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
7
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
8
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
9
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला
10
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
11
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
12
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
13
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
14
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी
15
अभिनेता आस्ताद काळेने लिव्ह-इन रिलेशनशीप अन् पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणाईला दिला 'हा' मोलाचा सल्ला
16
टीम इंडियाचा स्टार अय्यर अडकला विवाहबंधनात; 'श्रुति'ला बनवले आयुष्याचा जोडीदार
17
"टूथब्रश न्यायला विसरु नका कारण..."; तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवालांना परेश रावलचा सल्ला
18
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
19
दारू पिऊन गाडी चालवू नका! पुण्यात २ दिवसांत १५४ वाहनचालकांवर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची कारवाई
20
PICS : षटकारांचा पाऊस! अमेरिकेच्या शिलेदारानं रचला इतिहास; सलामीच्या सामन्यात यजमानांचा दबदबा

ब्रह्मपुरीत काँग्रेस नगरसेवकाच्या घरून दारूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 5:00 AM

महेश भर्रे यांच्या घरात भारतीय बनावटीची विदेशी व देशी मद्याचा साठा लपवून ठेवला आहे. मद्यसाठ्याची वाहतुक करण्याकरिता एचएच ०१ एएल २१५३ या क्रमांकाच्या स्कार्पिओचा वापर करीत असल्याची माहिती गुप्तहेरामार्फत मुबंई येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाल्याचे समजते. या आधारे कार्यालयीन स्टाफ, दोन पंचांना सोबत घेऊन महेश भर्रे यांच्या घरावर धाड घातली. 

ठळक मुद्देमुबंई येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ब्रह्मपुरी येथील काँग्रेसचे नगरसेवक महेश चंद्रभान भर्रे यांच्या घरी मुंबई येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने अचानक धाड घातली. यामध्ये ३ लाख ३४ हजार ५२८ रुपयांची देशी-विदेशी दारू व आठ लाखांची स्कार्पिओ असा एकूण ११ लाख ३४ हजार ५२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एका नगरसेवकाच्या घरातून मोठा दारूसाठा हस्तगत केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई बुधवारी रात्री राज्य उत्पादन शुल्क गोंदियाचे दुय्यम निरीक्षक अजय उईके यांच्या तक्रारीवरून करण्यात आली.या प्रकरणी घरमालक महेश भर्रे यांच्यासह मद्यसाठा पुरवठा करणारे नानु नाकतोडे, नकुल शिलोकर, दुर्गेश बसाखेत्री व प्रदीप चंद्रभान भर्रे या पाच जणांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा अधिनियम १९४९ कलम ६५ (अे)(ई), ८१, ८३, व १०८ अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपींनी फरारी घोषित केले आहे.महेश भर्रे यांच्या घरात भारतीय बनावटीची विदेशी व देशी मद्याचा साठा लपवून ठेवला आहे. मद्यसाठ्याची वाहतुक करण्याकरिता एचएच ०१ एएल २१५३ या क्रमांकाच्या स्कार्पिओचा वापर करीत असल्याची माहिती गुप्तहेरामार्फत मुबंई येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाल्याचे समजते. या आधारे कार्यालयीन स्टाफ, दोन पंचांना सोबत घेऊन महेश भर्रे यांच्या घरावर धाड घातली. घरासमोर उभ्या असलेल्या स्कार्पिओची झडती घेतली. वाहनात देशी मद्याचे १८० मिली व ९० मिलीचे विविध ब्रॅण्डचे ७२ बाॅक्स आढळून आले. यानंतर घराची झडती घेतली. घरात कोणीही व्यक्ती नव्हती. मात्र घरातही दारूसाठा आढळून आला. घरातून विदेशी व देशी मद्याचे १८० मिलीचे विविध ब्रॅण्डचे २३ बाॅक्स आढळून आले. असा एकूण ११ लाख ३४ हजार ५२८ रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. अधिक तपास राज्य उत्पादन शुल्कच्या मुंबई येथील भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक सुहास झांझुर्णे करीत आहेत. ही कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्कच्या गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर येथील स्टाफचे सहकार्य घेण्यात आल्याचे समजते. 

खोट्या कारवाईत गोवण्याचा विरोधकांचा डाव - महेश भर्रेराजकीय विरोधकांकडून घरी नसल्याची संधी साधून ही कारवाई केली आहे. ज्या वाहनातून दारूसाठा जप्त केला त्या वाहनाशी आपला काहीही संबंध नाही. घरातून १५ ते १८ पेट्या दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. ही कारवाई वस्तुस्थितीला धरून नाही. घरातून वा घरातील व्यक्तीच्या ताब्यातून कोणत्याही प्रकारची मद्यसामुग्री मिळालेली नाही. राजकीय षडयंत्रापोटी व बदनामीसाठी या कारवाईत आमचा संबंध जोडण्याचा प्रकार केला असल्याचे महेश भर्रे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

 

टॅग्स :liquor banदारूबंदी