शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पाऊले चालली गरजवंतांच्या दारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 05:00 IST

फुकटनगर मधील एका दिव्यांग महिलेकडे जेव्हा जीवनावश्यक वस्तुंची किट पोहचविण्यात आली, तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू तरंगत होते, ‘तुम्ही देवासारखे आले’ अशी तिची प्रतिक्रिया होती. मदत घेणारा अडचणीत आहे, कोरोनाने निर्माण केलेल्या परिस्थितीतीशी तो लढत आहे, अशावेळी तो एकटा नाही तर आपण सगळे त्याच्यासोबत आहोत, या भावनेतून अनेक स्वयंसेवी संस्था तसेच व्यक्तींकडून गरजूंना जीवनाश्यक साहित्य वाटपाचे काम अव्याहतपणे सुरू आहे.

ठळक मुद्देसेवाभावी संस्था सरसावल्या : जीवनाश्यक साहित्य वितरण सुरूच

सचिन सरपटवार।लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : ‘आदल्या दिवशी फक्त चणे खाल्ले, रात्री तर जेवलोच नाही, दुसऱ्या दिवशी मात्र जेवणाचा डब्बा आला’ ही प्रातिनिधीक व्यथा आहे विजासन ते देऊळवाडा टेकडीवर राहणाऱ्या एका कुटुंबातील. कोरोनाच्या प्रभावामुळे असे अनेक गरीब कुटुंब सकाळ व संध्याकाळचे झाले, उद्याच्या भोजनाचे काय, या विवंचनेत आहेत. परंतु प्रशासनाची वाट न बघता अशा गरजु व्यक्तींना मदत करण्यासाठी शहरातील अनेक हात सरसावले आहेत.फुकटनगर मधील एका दिव्यांग महिलेकडे जेव्हा जीवनावश्यक वस्तुंची किट पोहचविण्यात आली, तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू तरंगत होते, ‘तुम्ही देवासारखे आले’ अशी तिची प्रतिक्रिया होती. मदत घेणारा अडचणीत आहे, कोरोनाने निर्माण केलेल्या परिस्थितीतीशी तो लढत आहे, अशावेळी तो एकटा नाही तर आपण सगळे त्याच्यासोबत आहोत, या भावनेतून अनेक स्वयंसेवी संस्था तसेच व्यक्तींकडून गरजूंना जीवनाश्यक साहित्य वाटपाचे काम अव्याहतपणे सुरू आहे. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाला काही देणे लागतो, ही भावना रूजल्याने गरजवंतांकडे सहजपणे मदत पोहोचत आहे.दररोज ३५० भोजनाचे डब्बेएकही व्यक्ती उपाशी राहू नये, यासाठी खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर व नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्यामार्फत शहरातील वृद्ध व गरजुंना दररोज दोन्ही वेळचे ३५० जेवणाचे डब्बे प्रभागनिहाय वाटप केले जात आहे. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात खासदार धानोरकर यांच्याकडून दररोज पाच हजार जेवणाचे डब्बे वाटप पोहचवणे सुरू आहे. नगरसेवक तथा कार्यकर्तेही प्रभागनिहाय जबाबदारी स्वीकारून मदत कार्य करीत आहे. नगर परिषदेतर्फे केलेल्या सर्वेक्षणानुसार काही व्यक्तींकडे रेशनकार्ड नसल्याचे आढळले. अशा व्यक्तींना धान्य देण्यात येणार आहे.मदत करणाऱ्या संस्थायुथ फाऊंडेशन, योगा डॉन्स ग्रुप, विंजासन बुद्ध लेणी, साधू बहुउद्देशीय संस्था, गुरुदेव सेवा मंडळ, जैन मंदिर, भद्रनाग मंदिर देवस्थान, संत निरंकारी मंडळ, उन्नती एएलएफ, नगर परिषद, लोकसेवा मंडळ, लोकमान्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, लोकमान्य ज्ञानपीठ, बचतगट महिला, नगर परिषद कर्मचारी, सुतार समाज, अंबिका लॉन, लक्ष्मी किराणा स्टोअर्स, ब्लड कॅम्प ग्रुप, बळवंतराव गुंडावार, अ‍ॅक्स मशिद, हनुमान मंदिर, बीपीएल ग्रप संताजी नगर.

टॅग्स :Socialसामाजिकsocial workerसमाजसेवक