शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात मचाण पर्यटनाला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 11:40 AM

पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन ताडोबा प्रशासनाने बफर झोन क्षेत्रातील आगरझरी आणि देवाडा वनक्षेत्रात ३० नोव्हेंबरपासून मचाण पर्यटनला सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनिसर्ग सौंदर्य अनुभवण्याची संधी शुभारंभाप्रसंगी झाला पर्यटकांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : हमखास व्याघ्र दर्शनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर झोन क्षेत्रात ३० नोव्हेंबरपासून प्रथमच मचाण पर्यटनाला सुरूवात झाली आहे. यामुळे पर्यटकांना व्याघ्रदर्शनासह ताडोबातील नैसर्गिक सौंदर्य जवळून अनुभवता येणार आहे. या नाविन्यपूर्ण पर्यटनाचा उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी लाभ घेणाऱ्या पुण्यातील तीन पर्यटकांचा वन विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला.ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प हमखास व्याघ दर्शनासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. यामुळे देश-विदेशातील पर्यटक ताडोबात व्याघ्र दर्शनासाठी येतात. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन ताडोबा प्रशासनाने बफर झोन क्षेत्रातील आगरझरी आणि देवाडा वनक्षेत्रात ३० नोव्हेंबरपासून मचाण पर्यटनला सुरू करण्यात आली आहे. या मचाण पर्यटनामध्ये सर्वप्रथम जिप्सीमधून फेरफटका मारून आणल्यानंतर मचाणावर सोडण्यात येणार आहे. पर्यटनाच्या पहिल्याच दिवशी पुण्यातील मंदार नायडू, श्रीनिवास नायडू यांनी आगरझरी वन परिसरातील मचाणावरून तर देवाडा येथील मचाणावर पर्यटक फिदा निरखवाला यांनी ताडोबातील व्याघ्रदर्शन व सौंदर्याचा आनंद लुटला. मचाण पर्यटनाचा प्रथमच लाभ घेणाºया या पर्यटकांचा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.मचाण पर्यटन कसे कराल?पर्यटनाच्या दोन दिवसांआधीच ताडोबा क्षेत्रसंचालक कार्यालयात नोंदणी करावी लागते. नोंदणीनंतर पर्यटकांना हमीपत्र तसेच बंधपत्र भरू न द्यावा लागणार आहे. मचाणावर टाकण्यासाठी चटई, चादर व बेडशिटची व्यवस्था पर्यटकांना स्वत:च करावी लागेल. जेवण, पाणी, औषधी व इतर सामुग्रीची जबाबदारी पर्यटकांवरच राहील. एका मचाणावर फक्त दोनच व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येणार आहे.-अन्यथा पर्यटकांना दंडपर्यटकांना नियोजित वेळेआधी मचाणावरून खाली उतरण्यास मनाई करण्यात आली. खाली उतरल्याचे आढळल्यास कारवाई करून दंड ठोठावण्यात येणार आहे. पर्यटकांनी डोक्याला सुंगधित तेल व अत्तर लावण्यास प्रतिबंध घालण्यात आला. प्लास्टिक व अन्य वस्तू मचाणावर नेता येणार नाही. मचाण पर्यटन यशस्वी झाल्यानंतर हा प्रयोग ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील अन्य स्थळांवरूनही सुरू केल्या जाणार आहे.

टॅग्स :Tadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प