माढेळी-केळी-नागरी दुपारची बस सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:16 IST2021-02-19T04:16:34+5:302021-02-19T04:16:34+5:30

चंद्रपूर : कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने ग्रामीण भागातील बससेवा बंद केली होती. सध्या काही बस ...

Start the Madheli-Keli-Nagari afternoon bus | माढेळी-केळी-नागरी दुपारची बस सुरू करा

माढेळी-केळी-नागरी दुपारची बस सुरू करा

चंद्रपूर : कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने ग्रामीण भागातील बससेवा बंद केली होती. सध्या काही बस सुुरू करण्यात आल्या तरीही अन्य मार्गावरील बसफेऱ्या बंद आहे. त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

आता शाळा, काॅलेज सुरू झाल्याने माढेळी मार्गावरच्या बसफेऱ्या वाढविण्याची मागणी व बंद असलेली माढेळी-केळी-नागरी ही बस सेवा पूर्ववत तातडीने सुरू करावी, अशी मागणी शुभम चिमूरकर, संकेत वानखेडे, विशाल बरडे, अभय महल्ले, वैभव शेंडे, नयन डोंगरे, चेतन मोहितकर, हर्षल वाढई आदी युवकांनी केली आहे.

माढेळी-केळी-नागरी मार्गावर सध्या १२ ची व ५:३० ची बससेवा सुरु आहे. त्यात -माढेळी-वाघनख-येवती-केळी,नागरी व इत्यादी गावचे विद्यार्थी या मार्गाने प्रवास करतात,या विद्यार्थ्यांना बंद असलेल्या बसेसमुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Web Title: Start the Madheli-Keli-Nagari afternoon bus