शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरु

By admin | Updated: February 4, 2017 00:36 IST

राजुरा तालुक्यातील धोपाळा, सास्ती, कोलगाव, मानोली, भंडागपूर, माथरा येथील शेकडो शेतकरी उपोषणाला बसले असून ...

मागण्यांची पूर्तता करा : प्रशासन व वेकोलि व्यवस्थापनाचे दुर्लक्षराजुरा : राजुरा तालुक्यातील धोपाळा, सास्ती, कोलगाव, मानोली, भंडागपूर, माथरा येथील शेकडो शेतकरी उपोषणाला बसले असून २४ तास उलटूनही वेकोलि आणि प्रशासनाचे एकही अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळाला भेट दिली नाही. वेकोलिने इतर ३७२ हेक्टर जमीन अधिगृहीत करुन घेतली. परंतु वेकोलि आणि केंद्र शासनाच्या निष्क्रीय धोरणामुळे शेकडो कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.राजुरा येथे विलास घटे, बाळू जुलमे, राजु मोहारे, बालाजी पिंपळकर, रवींद्र बोबडे, सोनु गाडगे असे सहा प्रकल्पग्रस्त शेतकरी आमरण उपोषणाला बसले असून या भागातील शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकरी त्यांच्या समर्थनार्थ पेंडालमध्ये बसले आहे. वेकोलि प्रशासन खदान सुरु करण्याबाबत जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात आहे. शेतीवर लागणाऱ्या सेक्शनमुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. त्याचबरोबर वेकोलिच्या प्रचंड प्रदूषणाने शेतीच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. सदर प्रक्रिया गेली पाच वर्षापासून वेकोलिने सुरु केली आहे. त्यामुळे येथील सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळणार या आशेने दुसरीकडे कुठेही गुंतवणूक न करता वेकोलीने दिलेल्या आश्वासने बळी पडले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे मुला-मुलीचे शिक्षण, मुलीचे लग्न, घरातील आर्थिक परिस्थती, आरोग्याच्या समस्यामुळे येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी नरकयातना भोगत आहे. कर्जबाजारी होऊन शेतकऱ्यांवर करो या मरो ची अवस्था झालेली आहे. या संपूर्ण प्रकरणात वेकोलिच्या बड्या अधिकाऱ्यांशी वारंवार निवेदन देवून विचारपूस केली असता येथील अधिकारी आणि वरील अधिकाऱ्यांनी सांगीतलेल्या माहितीत तफावत आहे. या अगोदर समस्त प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी ८०० ते ९०० च्या संख्येने भवानी माता मंदिर ते तहसील कार्यालयपर्यंत मुक मोर्चा काढून निवेदने दिली. लवकरात लवकर शेती अधिग्रहीत करुन नोकरी आणि शेतीचा मोबदला द्यावा, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करु. आमच्या १०८० प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांपैकी जगदीश गजानन मोहारे यांनी शेतात नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे विष प्राशन करुन आपले जीवन संपविले. इतर शेतकऱ्यांवर अशी परिस्थिती येऊ नये, याची वेकोलि व शासनाने काळजी घ्यावी व ३१ मार्च २०१७ च्या आत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करावे, अशी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)राजकीय नेत्याची भेटप्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या उपोषण स्थळाला राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे, माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, माजी आमदार सुभाष धोटे, जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, राजुरा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. बी. यू. बोर्डेवार, चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष डॉ. उमाकांत धोटे यांनी भेट दिली.आंदोलन तीव्र करण्याचा इशाराप्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आंदोलन तिव्र करण्याचा इशारा दिला असून जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सुरु ठेवण्याचा इशारा विजय चन्ने, बाळू जुलमे, विलास घटे, बालाजी कुबडे, राजु मोहारे, मनिषा पायघन, शालू पिंपळकर, मनिषा बोबडे, अर्चना मोहारे, विजया कुबडे यांच्यासह विविध गावातील प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.