चिमूर येथील राज्य परिवहन विभागाच्या आगारामध्ये इंधन बचाव कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आगार व्यवस्थापक राकेश बोधे, तर प्रमुख पाहुणे म्हणून जितेंद्र सहारे, राजकुमार चुनारकर, भरत बंडे, वाहतूक निरीक्षक इम्रान शेख इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमात इंधन वाचविण्याकरिता उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आगारातील चालक हिवराज कन्नाके व एस.बी. वाघ तथा तांत्रिक कर्मचारी राहुल पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थितांना जितेंद्र सहारे व राजकुमार चुनारकर यांनी या उपक्रमात सहभागी होण्याकरिता प्रोत्साहनपर मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन तथा आभार वरिष्ठ लिपिक होमराज शिडाम यांनी केले. यशस्वितेसाठी लिपिक उमेश मात्रे, गजानन पुल्लुरवार व प्रशांंत नौकरकार यांनी सहकार्य केले.