शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

भरधाव वाहनांवर स्पीडलेसर बसविणार अंकुश

By admin | Updated: October 28, 2015 01:13 IST

नियमांचे उल्लंघन करून भरधाव वाहने चालविणाऱ्या चारचाकी, दुचाकी वाहनांची गती मोजणारे स्पीडलेसर नावाचे यंत्र वाहतूक पोलिसांच्या दिमतीला आले आहे.

नवे उपकरण आले : कडक अंमलबजावणी होणारचंद्रपूर : नियमांचे उल्लंघन करून भरधाव वाहने चालविणाऱ्या चारचाकी, दुचाकी वाहनांची गती मोजणारे स्पीडलेसर नावाचे यंत्र वाहतूक पोलिसांच्या दिमतीला आले आहे. यामुळे चंद्रपूर शहरातून आणि राज्य मार्गावरून भरधाव धावणाऱ्या वाहनांवर चाप बसणार आहे.चंद्रपूर शहराकडे येणारा वाहनांचा लोंढा आणि वेगमर्यांदेचे उल्लंघन करून धावणारी वाहने ही वाहतूक पोलिसांसाठी नेहमीच डोकेदुखी ठरली आहे. यातून भर शहरात आणि राज्य मार्गावर अनेकदा अपघात घडले आहेत. हा प्रकार रोखण्यासाठी स्पीडलेसर हे नवे उपकरण चंद्रपूर वाहतूक पोलिसांना जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाने उपलब्ध करून दिले आहे. चार स्पीडलेसरची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. त्यापैकी सध्या एकच उपकरण प्राप्त झाले आहे. व्हिडीओ कॅमेऱ्यासारखे वाटणारे हे उपकरण असून ते कुठेही स्टँडवर लावता येते. त्याला बराच काळपर्यंत चालणारी बॅटरी जोडण्यात आली असून कुणालाही सहज हाताळता येईल, असे हे उपकरण आहे. यात १५० मीटर लांब अंतरावरील वाहनाचा वेग मोजण्याची आणि नोंदविण्याची व्यवस्था आहे. या सोबतच छायाचित्रे, व्हिडीओ शुटींगही यात घेतले जाऊ शकते. वाहनाचा वेग, नोंदीची वेळ, वाहनाचा क्रमांक आदी बाबींच्या प्रिंट काढण्याचीही व्यवस्था यात आहे. हयगयीने आणि बेजबाबदारपणे तसेच वेगमर्यादेचे उल्लंघन करून वाहन चालविल्याबद्दल कायद्यात दंडाची तरतुद आहे. तरीही बरेचदा पुराव्याअभावी अरोपी निर्दोष सुटतात. मात्र या उपकरणामुळे या सर्व अडचणीवर उत्तर सापडले आहे. शहरातील वाहतुकीसंदर्भात माहिती देताना चंद्रपूर शहर वाहतूक पोलीस निरीक्षक अशोक कोळी म्हणाले, आपण रूजू झाल्यापासून गेल्या महिनाभराच्या काळात वाहतूक कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ५ हजार ५०० दुचाकी आणि चारचाकी वाहनांविरोधात कारवाई केली आहे. ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार असून कर्कश हॉर्न, फॅन्सी नंबर प्लेट, स्टंटबाजी करणाऱ्या वाहनाच्या आणि चालकांच्या विरोधातही अशीच कारवाई केली जाणार असल्याचे संकेत दिले. छोटा बाजार परिसरातील सिग्नल पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू असून जटपुरा गेटवर वाहतुकीचा पडणारा रेटा रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. (जिल्हा प्रतिनिधी)