गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नांदेड, यवतमाळ या जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात पोलीस दलाने दिलेली जबाबदारी पार पाडत असताना केलेल्या विशेष कामगिरीबद्दल राज्यातील १,७८८ पोलिसांना पदक जाहीर झाले आहे. यामध्ये पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार, दीपक खोब्रागडे, गोपाल भारती, सहायक पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, वीरसेन चंहादे, विनोद रहांगडाले, वनमाला पारधी, कुमारसिंग राठोड, पोलीस उपनिरीक्षकांमध्ये रेखा काळे, रामदास ढोक, जीवनदास लाकडे, अशोक माहुरकर, अनिल मालेकर, कांता रेडीवाड, राजेश सरोदे, सहायक फौजदारांमध्ये संतोष येनगंधेवार, मधुकर मेश्राम, प्रकाश इखार, सुधीर तिवारी, हरिश्चंद्र किन्नाके, सुरेश बोरकुटे, मधुकर सापावार, सुधाकर तोडास, बंडू कुमरे, शंकर मोहुर्ले, वाल्मीक मेश्राम, नरेंद्र खोब्रागडे, बन्सीलाल कुडावले, नायब पोलीस शिपाईमध्ये हेमंत धवणे, राजकुमार चौधरी, राजेंद्र जुमनाके, आसाराम मडावी, संदीप मुडे, साईनाथ जायभाये, संजय शुक्ला, नीलेश महात्मे, सुरेश मडावी, पोलीस शिपाईमध्ये स्वप्निल खोब्रागडे, विनोद बन्सोड, गिरीश नांदे, विशाल खडके, शंकर जाधव, प्रकार निमकर, सुनील गेडाम, रमेश वाकडे, अशोक मडावी, विजय सोनवणे, राजेश चिताडे, प्रवीण कोवे, प्रदीप ताडाम, नवनीत सोनुले, सुभाष कुकुडकर, प्रमोद गट्टे, राजू चिताडे, रामचंद्र पुष्पपोळ, भगवान पडवाळ, प्रभू मालीलपाडा, सतीश गिरी, विनोद पडवाळे, बादल जाधव, गजानन चाराळे, खंडेराव मडावी, अविनाश झाडे, मंगेश गायकवाड, दिलीप केचे, खंडेराव माने, बालाजी मारवाडी, दत्ता थिटे, अविनाश ढोके, उषा मेकतीवार, शोभना सुरे, कविता पळनाठे, सोनू धोडमारे, जयश्री लोनबले, हुजबाना पठाण, मीनाक्षी गोडाम, सोनाली रेगूनवार, विशाल बगडे आदींचा समावेश आहे.
तीन पोलीस निरीक्षकांसह ७५ पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष सेवा पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:23 IST