शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

भाव वाढल्याने सोयाबीनचा पेरा वाढला; मात्र ‘मिलीबग’च्या संकटाने शेतकरी धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 05:00 IST

सोयाबीनवर मोठ्या प्रमाणावर आढळणाऱ्या व नुकसानकारक असणाऱ्या खोडमाशी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी, पाने पोखरणारी अळी, चक्री भुंगे, उंट अळी, केसाळ अळी, हुमणी तसेच तुडतुडे, फुलकिडे व पांढरी माशी इत्यादी किडींची प्रादुर्भाव दिसून येत आहे. सोयाबीनला शेंगा लागण्याची स्थिती असतानाच मिलीबग (पिठ्या ढेकूण) रोग वाढू लागला. रोग नियंत्रणासाठी कृषी विभाग जागृती करीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सोयाबीन पिकावर २७२ प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होतो, असे कृषितज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्या सोयाबीनला चांगला दर आहे. वातावरणामुळे कपाशीची स्थिती बरी असली तरी अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकावर मिलीबग (पिठ्या ढेकूण) रोगाने आक्रमण केले आहे. रोग नष्ट झाला नाही तर उत्पादन घटण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.सोयाबीनवर पडणाऱ्या किडींचे पुढील सहा गटांमध्ये वर्गीकरण केले जाते. त्यामध्ये बियाणे व रोपे खाणाऱ्या किडी, खोड पोखरणाऱ्या किडी, पाने खाणाऱ्या किडी, रस शोषणाऱ्या किडी, फुले व शेंगा खाणाऱ्या किडी आणि  साठवलेल्या बियाण्यातील किडींचा समावेश होतो. यापैकी सोयाबीनवर मोठ्या प्रमाणावर आढळणाऱ्या व नुकसानकारक असणाऱ्या खोडमाशी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी, पाने पोखरणारी अळी, चक्री भुंगे, उंट अळी, केसाळ अळी, हुमणी तसेच तुडतुडे, फुलकिडे व पांढरी माशी इत्यादी किडींची प्रादुर्भाव दिसून येत आहे. सोयाबीनला शेंगा लागण्याची स्थिती असतानाच मिलीबग (पिठ्या ढेकूण) रोग वाढू लागला. रोग नियंत्रणासाठी कृषी विभाग जागृती करीत आहे.

नियंत्रणाचे उपायजैविक कीडनाशकाचा वापर करताना व्हर्टिसिलियम लेकॅनी ४० ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जेथे किडीचा प्रादुर्भाव आहे तेथेच याची फवारणी करण्याचा सल्ला कृषी अधिकाऱ्यांनी दिला. 

काय आहे मिलीबग ?मिलीबग कीड कपाशीचे खोड, पानाच्या देठाजवळ पुंजक्यात राहते. ही कीड झाडातील रस शोषण करते. कीड चिकट द्राव सोडते, त्यामुळे पाने काळपट होतात. जास्त प्रादुर्भाव झाला तर पाने व फांद्या वाळून जातात.

मिलीबग रोखण्यासाठी ही घ्या काळजी  रासायनिक कीडनाशकांचा वापर करताना क्लोरपायरिफॉस (२० टक्के) ३० मि.लि. किंवा बुप्रोफ्रेझीन २० मि.लि. प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ही फवारणी प्रादुर्भावित पाने, झाडाचे खोड तसेच जमिनीवरदेखील करावी.

पेरणीवर लावलेला पैसा निघतो की नाही ?

माझी शेती बल्लारपूर तालुक्यात आहे. सोयाबीन पेरणीपासूनच यंदा हवामान व पाऊस पोषक आहे. मात्र, काही दिवसांपासून किडीचा प्रादुर्भाव सुरू झाला. काही दिवसांपूर्वीच फवारणी केली आहे. फवारणीचा फायदा झाला नाही तर लागवडीचा खर्च तरी निघण्याची शक्यता कमीच आहे. -रामचंद्र येरणे,  शेतकरी भिवापूर वॉर्ड, चंद्रपूर

कपाशीची स्थिती चांगली आहे. परंतु सोयाबीन पिकावर मिलीबगने आक्रमण केले. झाडाला शेंगा लागत आहेत. त्यातच हा रोग आल्याने चिंता वाढली. कृषी विभागाच्या पथकाने शेतीची पाहणी करून प्रतिबंधात्मक फवारणीची माहिती दिली. त्यानुसार फवारणी सुरू केली आहे. माझ्या शेतीजवळचे अन्य शेतकरीही फवारणी करीत आहेत.- गंगाधर मालधुरे,  शेतकरी, बल्लारपूर

 

टॅग्स :agricultureशेती