शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 00:29 IST

नगदी पीक म्हणून जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन लागवड केली. शासनाने यावेळी चांगला दरदेखील दिला आहे. परंतु, अल्प पावसामुळे उत्पादनात मोठी घट आली. लागवडीचा खर्च निघणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.

ठळक मुद्देअल्प उत्पादनाचा फटका : यंदाही कर्ज जैसे-थे राहणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नगदी पीक म्हणून जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन लागवड केली. शासनाने यावेळी चांगला दरदेखील दिला आहे. परंतु, अल्प पावसामुळे उत्पादनात मोठी घट आली. लागवडीचा खर्च निघणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात यंदा सोयाबीनचा पेरा वाढला होता. कापूस उत्पादक शेतकºयांनी गतवर्षाचा अंदाज घेऊन सोयाबीनला लागवडीला प्राधान्य दिले. अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभाग तसेच पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांमार्फत बियाण्याच्ांी खरेदी केली. पहिल्या टप्प्यात बऱ्यापैकी पाऊस आला. त्यामुळे सोयाबीन पीक समाधानकारकरीत्या उगविले होते. मात्र, सोयाबीन पीक दाणे भरण्याच्या स्थित असताना पावसाने दगा दिला. याचा जोरदार फटका जिल्ह्यातील पिकांना बसला आहे. राजुरा, कोरपना, गोंडपिपरी व बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबिनची मळणी केली. यामध्ये एकरी उत्पन्नात मोठी घट आली. शासनाने सोयाबिनला हमीभाव दिल्याने शेतकरी आशावादी झाला होता. व्यापाऱ्यांच्या दारात न जाता आपल्या तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून हमी भावाने सोयाबिन विकण्याचे स्वप्न पाहत होते. पण यंदाच्या अल्प उत्पादनाने शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतीसाठी बँका आणि विविध कार्यकारी सोसायट्यांमार्फत शेतीसाठी कर्ज घेतले होते. उत्पादन न झाल्याने कर्जाची परतफेड कशी करावी, या प्रश्नाने शेतकरी हतबल झाल्याचे दिसून येत आहे.शेतकऱ्यांचा अपेक्षाभंगमागील तीन वर्षांपासून सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकºयांचे अर्थकारण बिघडले. खर्चाच्या तुलनेत उत्पादन होत नसल्याने रब्बी व खरिप हंगामाचे नियोजन करण्यासाठी अडचणी पुढे येत आहेत. काळानुसार शेती करतो म्हटले तर निसर्ग साथ देत नाही. भरघोस उत्पन्न मिळाल्यास सुलतानी संकट उभे राहते. हा प्रकार यंदाही शेतकºयांबाबत घडत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती